आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै-ऑगस्टमध्ये होणार सरासरीपेक्षा कमी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जूनमध्ये देशात मान्सून काळात जोरदार पाऊस झाला. देशभरात आतापर्यंत १९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. ९० टक्के भागांत सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै व ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा ८ ते १० टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने कृषी मंत्रालयाला आपत्कालीन परिस्थितीला तोेंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु हवामान खात्याचा अंदाज खासगी हवामान सस्था स्कायमेटने फेटाळला असून जुलै- ऑगस्टमध्ये देशात सरासरीएवढा पाऊस होईल, असा दिलासादायक अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जूनमध्ये पावसाबाबत स्कायमेटचा अंदाज खरा ठरला आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी सांगितले की "अनेक भागांत मान्सूपूर्व पाऊस चांगला झाल्याने जलसाठे काही प्रमाणात तयार झाले आहेत. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. जो पेरण्यांसाठी चांगला आहे. परंतु त्यावर आपल्याला संतुष्ट होता येणार नाही. जुलै व ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ८ ते १० टक्के कमी पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड करताना खबरदारी घ्यावी. ज्या भागांत १०० ते ११० मिलिमीटर पाऊस होते तिथे ६० ते ७० मिलिमीटर पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाऐवजी मका व इतर कमी पावसात तग धरणारी पिके घ्यावीत.'

अर्थात हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने आगामी काळातही सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०४ टक्के व ऑगस्टमध्ये सरासरी ९९ टक्के पाऊस होईल. सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. हवामान खात्याने या वर्षी सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यालाही स्कामयेटने हरकत घेतली असून पाऊस चांगला होईल असा दावा केला आहे.
केदारनाथ यात्रा उद्यापर्यंत स्थगित
डेहराडून | केदारनाथला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अर्थात हेलिकॉप्टरने जाणाऱ्या भाविकांसाठी यात्रा सुरू आहे. हवामान प्रतिकूल असतानाही अनेक अडचणींवर मात करून भाविक यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथला पोहोचत आहेत. कैलास मानसरोवर यात्राही शनिवारपासून पुन्हा सुरू झाली. बद्रीनाथ, गोविंदगड, घांगरिया येथे अडकलेल्या आठ हजार भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९०० भाविकांची हवाई मार्गाने सुटका करण्यात आली आहे.
एकाच कुटुंबातील चौघे ठार, उत्तर प्रदेशात इमारत कोसळली
बस्ती | उत्तर प्रदेशात रेल्वे स्टेशनजवळ पावसाने जुनी इमारत कोसळली. त्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोन मुलींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...