आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपु-या पावसाचा फक्त अंदाजच, घाबरू नका - अर्थमंत्री जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अपु-या पावसाच्या अंदाजामुळे शेअर बाजारात सुरू झालेली घसरण रोखण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरूवारी आघाडी सांभाळली. अपु-या पावसाचा फक्त अंदाजच आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मागच्या वर्षीही यापेक्षाही कमी पावसाचा अंदाज होता. परंतु सरकारने महागाई वाढू दिली नाही. यंदाही काळजी करू नका, महागाई वाढू देणार नाही, असे जेटली म्हणाले. जेटली म्हणाले की, हवामान खात्याच्या अंदाजानंतर मागील ४८ तासांत मीठमसाला लावून शंकाकुशंका सांगितल्या जात आहेत, त्या याेग्य नाहीत. देशातील हवामान शास्त्रज्ञांशी मी बुधवारी विचार-विनिमय केला. सामान्याच्या जवळपास पावसाचा अंदाज आहे. पाऊसमान चांगलेच असेल.

परिणाम का नाही?
यावेळी अपु-या पावसामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होईल, अशी शंका घेणे चूक आहे. पाऊस किती होतो, यापेक्षाही तो कधी आणि कुठे होतो, हे अधिक महत्वाचे आहे.

महागाई का नाही?
देशात पुरेसा अन्नधान्य साठा आहे. यावेळी अपु-या पावसाच्या अंदाजाच्या आधारावर महागाई वाढण्याची किंवा परिस्थिती बिघडेल, अशी शंका घेणे घाईचे ठरेल.

केरळमध्ये कोणत्याही क्षणी आगमन
केरळमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्याच्याशी संबंधित हालचाली वेगवान झाल्या आहेत. येत्या ४८ तासांत कोणत्याही क्षणी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते,असे हवामान खात्याने म्हटले आहे. सर्वसाधारणपणे १ जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. परंतु यावेळी मान्सून चार दिवस उशीराने येत आहे. केरळमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाशी संबंधित हालचाली वेगवान होतील, असे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सांगितले.