आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defused Grenade Found Inside Standby Aircraft For Prime Minister Modi\'s US Visit

नरेंद्र मोदी यांच्या राखीव विमानात आढळला डिफ्युज बॉम्ब, सुरक्षा एजन्सीकडून चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पंतप्रधान नरेंद्र मोदी)
नवी दिल्‍ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यासाठी दिल्ली विमानतळावर राखीव ठेवलेल्या विमानात ग्रेनेड (हातगोळा) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा एजन्सीने याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. आढळून आलेला ग्रेनेड निष्क्रीय असल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन दौर्‍यासाठी एअर इंडियाचे विमान 'बोइंग 747'मध्ये हे विमान नेले असते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
'टाइम्‍स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मोदी 30 सप्टेंबरला रात्री भारतात पोहोचले. मोदींसाठी राखीव ठेवण्यात आलेले 'बोइंग 747'ला दिल्‍ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दा यामार्गावर पाठवण्यात आले. विमान आज (शनिवारी) जेद्दा विमानतळावर पोहोचले असता सुरक्षा जवानांनी झाडाझडती घेतली. बिझनेस क्‍लासमध्ये निष्किय ग्रेनेड आढळून आला.
जेद्दा एअरपोर्ट सुरक्षा रक्षकांनी विमानाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच विमानाला उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी भारतीय सुरक्षा एजन्सी करत आहे.
एअरपोर्टवर मोठी सुरक्षा यंत्रणा असताना कथित 'ग्रेनेड' विमानात पोहोचला कसा? असा प्रश्न सुरक्षा एजन्सीसमोर उभा राहिला आहे.