आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delay In Deciding Mercy Plea Is A Relevant Ground For Commuting Death Sentence To Life Imprisonment: SC.

दयेच्या अर्जावरील विलंबाने 15 कुख्यात गुन्हेगारांची फाशी जन्मठेपेत बदलली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यात विलंब केल्याने फाशीची शिक्षा झालेल्या 15 कुख्यात गुन्हेगारांची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे कुख्यात चंदनतस्कर विरप्पन याच्या चार साथिदारांना अनपेक्षित लाभ मिळाला असून त्यांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली आहे. दरम्यान, विरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विरप्पनचे चार साथिदार ग्यानप्रकाशम, बिलावेंद्रन, सिमान आणि मिसाकारा माथाईयान यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना दयेचा अर्ज पाठविला होता. परंतु, त्यानंतर तब्बल 9 वर्षे त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. परंतु, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकताच या अर्जावर निर्णय घेतला होता. त्यांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. या विरोधात या चार गुन्हेगारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात राष्ट्रपतींनी केलेल्या दिरंगाईचे कारण देऊन द्या दाखविण्याची विनंती करण्यात आली होती.
घटनेच्या कलम 21 अंतर्गत फाशीच्या शिक्षेसंदर्भात निर्णय घेण्यास विलंब केल्याने जीवनाच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या तीन गुन्हेगारांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तिघांनी 11 वर्षांपूर्वी दयेचा अर्ज राष्ट्रपतींना सादर केला होता. परंतु, 2013 मध्ये हा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे.
दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर 14 दिवसांमध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मानसिक आजारी गुन्हेगाराची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
याचा लाभ देविंदरपालसिंग भुल्लर याला मिळू शकतो. 1993 मध्ये त्याने दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. त्याची मानसिक अवस्था बिघडल्याने आता त्याचे नातलग त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची विनंती करू शकतात.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण होते राजीव गांधींचे हत्यारे