आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delears Commission If Increased , LPG Gas Cylinder Price Hikes 3.50 Rs

डीलर्सचे कमिशन वाढल्यास एलपीजी गॅस सिलिंडर 3.50 रुपयांनी महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डीलर्सना 9 टक्क्यांपर्यंत कमिशन वाढीची मागणी मान्य झाल्यास स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमती 3.50 रुपयांनी महाग होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने 14.2 किलोच्या सिलिंडरवर डीलर्सना मिळणारे कमिशन 3.46 रुपयांनी वाढवून 40.71 रुपयांवर नेण्याची शिफारस केली आहे. अर्थात हा बोजा ग्राहकांनाच सोसावा लागेल. एक-दोन आठवड्यांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


एलपीजी सिलिंडरमधील शेवटची दरवाढ गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. तेव्हा डीलर्सचे कमिशन वाढवल्यामुळे गॅस सिलिंडर 399 रुपयांवरून 410.50 रुपयांवर पोहोचले होते. समितीने पाच किलोच्या सिलिंडरवरील कमिशनही 1.73 रुपयांनी वाढवून 20.36 रुपये करण्याची शिफारस केली आहे.