आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi: 2 Arrested For Racially Abusing NE Student News In Divya Marathi

विद्यार्थ्यावर वंशवादी शेरेबाजी, दोन अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ईशान्य भारतातील एका विद्यार्थ्यावर वंशवादी शेरेबाजी केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

अमितकुमार आणि आकाशकुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही मूळचे बिहारमधील छाप्रा येथील रहिवासी आहेत. मध्यरात्री आपल्याविरुद्ध वंशवादी टिप्पणी केल्याची तक्रार हेमांग हाओकिप या ईशान्येतील विद्यार्थ्याने केली होती. त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली. नवी दिल्लीतील मॉरिसनगर परिसरात दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसनजीक ही घटना घडली. पीडित तरुण आणि दोन आरोपी मॉरिसनगर येथील ख्रिश्चन कॉलनीमध्ये भाडेकरू म्हणून शेजारी राहतात, असे पोलिसांनी सांगितले. तिघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. नजीकच्या काळात दिल्लीमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत.