आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सरकार आज जनलोकपाल मंजूर करणार? काँग्रेसचे समर्थन नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारला बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत तर, आज (सोमवार) मंत्रिमंडळ बैठकीत जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
एका वृत्तवाहिनीनुसार, दिल्ली सरकार दिल्ली पोलिसांना जनलोकपाल अंतर्गत आणण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारी सुत्रांनी सांगितले आहे, की दिल्ली पोलिसांसह डीडीए आणि दिल्ली महानगरपालिकेलाही जनलोकपालच्या अखत्यारित आणले जाणार आहे.
एका इंग्रजी दैनिकानुसार, केजरीवाल सरकारकडून आणल्या जात असलेल्या जनलोकपाल विधेयकाला काँग्रेस सभागृहात पाठिंबा देणार नाही. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या लोकपाल विधेयकाच्या विरोधी हे विधेयक असल्याचे काँग्रेसे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे, की आम्ही दिल्ली सरकारकडून आणल्या जाणा-या विधयकाच्या एका-एका कलमचा बारकाईने अभ्यास करु आणि एक कलम जरी केंद्र सरकारने आणलेल्या लोकपाल विधेयकाच्या विरोधात जाणारे दिसले तर त्याचा कडाडून विरोध करु.