आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Airport: 2 Flights Searched After Bomb Scare; 4 MPs On board Air India Plane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉम्बची माहिती मिळाल्यावर दोन विमान उड्डाणे रोखली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) गुरुवारी दुपारी दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा इशारा मिळाल्यानंतर खळबळ उडाली. त्यामुळे रॉयल नेपाळ एअरलाइन्स आणि एअर इंडियाच्या दोन विमानांची उड्डाणे तत्काळ रोखण्यात आली.

नेपाळ एअरलाइनचे विमान आरए - २०६ काठमांडूला जाणार होते. एअर इंडियाचे विमान एआय- ०७५ भुवनेश्वरला जाणार होते. विमानतळ अधिकाऱ्यांनुसार, सकाळी १०.०० वाजता एका व्यक्तीने दूरध्वनीवर बॉम्ब असल्याची माहिती दिली. तो स्वत: सीबीआय अधिकारी अभिषेक सिंह असल्याचे सांगत होता. दूरध्वनी विमानतळाची देखभाल करणारी गुडगाव येथील कंपनी डॉयलच्या गुडगाव येथील कॉल सेंटरवरून करण्यात आला होता. सीआयएसएफच्या जवानांना त्वरित सतर्क करण्यात आले. प्रवाशांना विमानातून उतरवल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, तिथे कोणताही स्फोटक पदार्थ मिळाला नाही. पोलिसांना दूरध्वनी करणाऱ्याची ओळख पटवली जात आहे. संबंधित क्रमांकावरून बुधवारीही दिल्लीहून बँकॉककडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी घटनांमुळे अफवा पसरताच सुरक्षा यंत्रणा सर्व ती खबरदारी घेते.
बातम्या आणखी आहेत...