आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली: भाजप आमदाराला मार्शल्सनी काढले बाहेर, विरोधकांचे ठिय्या आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंधळा दरम्यान भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना मार्शलच्या हातून बाहेर काढण्याचे आदेश सभापतींनी दिले. - Divya Marathi
गोंधळा दरम्यान भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना मार्शलच्या हातून बाहेर काढण्याचे आदेश सभापतींनी दिले.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला मंगळवारी गोंधळात सुरुवात झाली. गोंधळा दरम्यान भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना मार्शलच्या हातून बाहेर काढण्याचे आदेश सभापतींनी दिले. आपल्या सहकारी आमदाराला बाहेर काढले जात असल्याचे पाहून विरोधीपक्ष नेते विजेंद्र गुप्ता आणि भाजप सदस्य जगदीश प्रधान यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या दिला आहे. याच परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरु आहे.
का काढले भाजप आमदाराला सभागृहाबाहेर ?
दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने जितेंद्रसिंह तोमर यांच्या मुद्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती. मात्र सरकारच्या वतीने प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत स्पष्टीकरणास नकार देण्यात आला. त्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ सुरु केला. गोंधळामुळे 15 मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरुच होता.
काय म्हणाले केजरीवाल ?
जितेंद्रसिंह तोमर यांच्यासंबंधी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, 'आम्ही तोमर यांना तत्काळ मंत्रिमंडळातून दूर केले आहे.' या प्रकरणात मला आंधारात ठेवण्यात आले होते, असेही केजरीवाल म्हणाले. त्यासोबतच त्यांनी या प्रकरणावरुन मोंदीना चिमटा काढला, ते म्हणाले, 'तोमर प्रकरणात जसे मला आंधारात ठेवण्यात आले तसे, सुषमा आणि वसुंधरा प्रकरणात पंतप्रधानांना अंधारात ठेवले आहे. त्यांनी देखील कारवाई केली पाहिजे.'
काय आहे तोमर प्रकरण ?
दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट पदवी प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
बातम्या आणखी आहेत...