नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या प्रचार कार्यालयावर सोमवारी सायंकाळी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हल्लेखोरांमध्ये बहुतांश वकिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, किरण बेदी यांच्या कृष्णानगरातील प्रचार कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी हजारो लोक जमले. त्यांनी किरण बेदी यांच्याविरुद्ध अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी केली. नंतर त्यांनी अचानक कार्यालयावर हल्ला बोल केला. दोन -तीन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. तसेच कार्यायातील सामानाची तोडफोड केली. हल्लेखोर वकील कडकडडूमा कोर्टातून आले होते. किरण बेदी कृष्णानगर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
पुढील स्लाइड्स वाचा, किरण बेदींना हुकुमशहा म्हणार्या भाजप नेत्याने राजनामा घेतला मागे...