आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Election Results 2015: Aap Registered Historical Victory In Delhi

अकल्पनीय...आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक विजय, कॉंग्रेस शून्यावर बाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आपच्या कार्यालयाबाहेर समर्थकांना अभिवादन करताना अरविंद केजरीवाल.
नवी दिल्ली - दिल्लीच्या निकालांनी दिल्लीलाच धक्का दिला. ना आम आदमी पार्टीला अशा विजयाची खात्री होती, ना भाजपला असा पराभव अपेक्षित होता. शून्यावर बाद होऊ, असे काँग्रेसला स्वप्नातही वाटले नसेल. मंगळवारचा दिवस चढता चढता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर केजरी‘वॉल’ बनले.

नरेंद्र मोदी- अमित शहांच्या १३ वर्षे जुन्या जोडीचा सलग ११ वा निवडणूक विजय रथ थांबला. नितीशकुमार, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या या मोदीविरोधकांनी हा अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे. आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अरविंद केजरीवाल यांची निवड करण्यात आली आहे. व्हॅलेंटाइन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल शपथ घेतील. मागच्या वर्षी याच तारखेला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
ही माझी पत्नी सुनीता... मी म्हणालो, आता घाबरू नको सरकारला!
आप : सगळेच अंदाज चुकले, प्रत्येक दुसरे मत ‘आप’ला...
139% जागा वाढल्या. मागच्या विधानसभेपेक्षा मतांमध्ये 24% वाढ. लोकसभेला 33 % मते.
31 जागा मिळाल्या 2013 मधील भाजपच्या ताब्यातील. काँग्रेसच्या 7 जागाही पटकावल्या.

परिणाम
*केजरीवाल व केंद्र सरकारमध्ये रस्सीखेच निश्चित
*आपची आश्वासने 1 लाख कोटींची, पैसे कुठून येणार ?
*या वर्षी बिहार, पुढच्या वर्षी बंगाल निवडणुकीत केजरीवाल प्रभाव
पुढे वाचा... ही माझी पत्नी सुनीता...