आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: केजरींच्या यशामागची ही आहेत कारणे, अशी चुकली भाजपनिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा जवळपास विजय निश्चित असून नरेंद्र मोदी यांचा विजयरथ थांबलेला दिसून येत आहे. डीबी डिजिटलचे नॅशनल एडिटर नवनीत गुर्जर सांगत आहेत, एकढ्या सखोल नियोजनासह निवडणुकीत उतरलेला भाजप अखेर का हरण्याच्या उंबरठ्यावर आहे, काय आहेत याची नेमकी कारणे...
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नियोजन सर्वथा चुकले आहे. नरेंद्र मोदी आतापर्यंत कॉंग्रेसला टार्गेट करीत होते. त्यावेळी त्याचे सर्वांना समाधान मिळत होते. दिल्लीतील पहिल्याच रॅलीत त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. हाच टर्निंग पॉईंट ठरला. बघा, बलवान आणि दुबळ्या या दोघांच्या लढाईत जनता दुबळ्या व्यक्तीसमोर असते. केजरीवाल या युद्धात दुबळे होते. जनता त्यांच्यासोबत गेली. आपला याची कल्पना होती. त्यांनी नेमका दुवा पकडला. तीन निवडणुका झाल्या. दिल्लीच्या आधी, लोकसभा निवडणुका आणि आता दिल्लीची निवडणूक. पण केजरीवाल यांनी कधी मोदींवर प्रखर हल्ला केला नाही. ही आपची रणनिती यशस्वी ठरली.
भाजप आणि मोदींना याची कल्पना नव्हती? त्यांनी असे का केले?
कल्पना होती. परंतु, त्यांचा निरंतर विजय याच पद्धतीने होत होता. जेव्हा यश मिळत जाते तेव्हा आपण काही तरी गमवत असतो. भाजपला विजयी जल्लोषात याची आठवण राहिली नसावी. उदाहरणासाठी 2004 च्या लोकसभा निवडणूक आठवा. सगळे पक्ष कॉंग्रेसच्या विरोधात गेले होते. भाजपकडून शायनिंग इंडिया चालवले जात होते. कधी काळी कॉंग्रेसमध्ये राहिलेल्या शरद पवार यांनीही विदेशीचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी सोनिया गांधी यांनी राजकीय हुशारी दाखवत भाषणाची एकच थीम ठेवली होती. त्यांनी म्हटले होते, की सगळे मिळून एका महिलेच्या मागे लागले आहेत. एका अबलेला टार्गेट करीत आहेत. ही गोष्ट क्लिक झाली. जराही अंदाज नसताना कॉंग्रेसचा विजय झाला. यावेळी एखाच प्रकारचे कार्टुन दिसत होते, राहुलला पाठिवर लटकवून हातात तलवार घेऊन निघालेल्या सोनिया गांधी... खुप लडी मर्दानी... झाशीची राणी...
भाजपला ही चुक सुधारता आली असती?
होय, नक्की सुधारता आली असती. पण त्यांनी तसे नाही केले. भाजप पूर्ण ताकदीनिशी केजरीवाल यांच्या मागे पडला. सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना प्रचारात उतरवणे, केजरीवाल यांच्या विरोधात दररोज एक जाहिरात देणे हे सगळे काय होते? भाजप यावेळी अगदी बलाढ्य दिसत होता. जनता केजरीवाल यांच्यासोबत गेली.
तर मग बनावट निधी गोळा करण्याचे झालेले स्टिंग केजरीवाल यांच्याविरोधात नाही गेले?
नाही. यालाही लोकांनी कमकुवत व्यक्तीच्या विरोधात बलाढ्य व्यक्तीचे षडयंत्र असे समजले. शिवाय जनतेला माहिती आहे, की राजकीय पक्ष याच पद्धतीने निधी गोळा करतात. मोठे पक्ष हा निथी अत्यंत नियोजित पद्धतीने घेत असतात. आप यात नवखा आहे.
किरण बेदी यांना आणण्याचा निर्णय फसला का?
चांगला होता. पण त्यानंतर शांतिभूषण यांनी किरण बेदी आणि केजरीवाल यांची तुलना करणे आणि बेदी यांना श्रेष्ठ सांगणे भाजपला भारी पडले. हे भाजपनेच घडवून आणले असावे. हेही असू शकते, की आपचा हा मास्टर स्ट्रोक असेल. पण याचा लाभ केजरीवाल यांना झाला. किरण बेदी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. पण त्या भाजपच्या चुकीच्या प्रचारात अडकल्या. दिल्ली भाजपमध्ये उफाळलेल्या मतभेदांनी या पक्षाचे पानिपत झाले. किरण बेदी यांना आणायचेच होते तर याचे नियोजन आधीच करायला हवे होते. भाजपला वाटले होते, की मोदी आणि शहा यांनी सांगितले, की बेदी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील तर कार्यकर्ते माना हलवून हे मान्य करतील. पण असे नाही झाले. यावेळी कार्य़कर्ते म्हणत होते, पक्षाचे काम आहे. करावेच लागेल... अखेर त्यांनी 'काम' केलेच.
नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आता समाप्त झाला आहे का?
नाही. असे म्हणता येणार नाही. धोरण चांगले असेल तर भाजप पुन्हा जिंकेल. मोदी पुन्हा इलेक्शन फिवर कॅप्चर करतील. मोदी मोदी आहेत आणि केजरीवाल केजरीवाल. हेही होऊ शकते, की बिहारच्या निवडणुकीत भाजपची सरशी झालेली दिसून येईल.
दिल्लीत झालेल्या भाजपच्या पराभवाचा देशभर परिणाम होईल का?
होय, नक्किच पडेल. आगामी अर्थसंकल्प अनुकूल असेल. पक्षांतर्गत फेरफार सध्या टाळले जातील.