आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Arvind Kejriwals Two Valentine Days

केजरीवालांचा एक रडका, तर दुसरा भरभरुन हसवणारा Valentine Day

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अरविंद केजरीवाल यांची लव्हस्टोरी चक्क नागपुरची आहे. अरविंद आणि सुनिता यांची पहिली भेट आयआरएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर येथील राष्ट्रीय प्रशासनिक अकादमीत झाली होती. यावेळी अरविंद यांचे सुनिता यांच्यावर प्रेम जडले. पण व्यक्त व्हायला चक्क चार महिने गेले. आज प्रपोज करु, उद्या करु असे करीत केजरीवाल यांनी चक्क चार महिने लावले होते. प्रेमातून लग्नाकडे जाणाऱ्या या प्रेमापाखरांसाठी व्हॅलेंटाईन डे अतिशय महत्त्वाचा असतो. त्याचे सेलिब्रेशन तसे साजूक असले तरी मनातील भावना मात्र एकमेकांकडे शेअर केल्या जातात. पण हाच व्हॅलेंटाईन 2014 मध्ये त्यांच्यासाठी रडका तर 2015 मध्ये भरभरुन हसवणारा ठरला आहे.
कॉंग्रेसच्या पाठिंब्याने 49 दिवसांचे सरकार चालवल्यानंतर अखेर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी 2014 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अत्यंतिक दुःखाचा होता. त्यांनी एक मोठे पद गमावले होते. यानंतर जेव्हा केव्हा त्यांनी मीडियासोबत या विषयावर चर्चा केली तेव्हा ते म्हणाले, की ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चुक होती. मी राजीनामा द्यायला नको होता. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही चुक घडली होती. याची त्यांचा मनात कटुता होती. अपार दुःख होते. निश्चितच सुनिता यांनी यावेळी केजरीवाल यांना सावरले असावे. कारण दोघांमधील दृढ नातं आजही तेवढंच गहिरं आहे.
पण यावर्षीचा व्हॅलेंटाईन अरविंद केजरीवाल यांच्यासाठी भरभरुन सुख घेऊन येणारा ठरणार आहे. याच दिवशी रामलिला मैदानावर शपथ घेण्याचा मनोदय केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. असे झाले तर त्यांच्या भळभळणाऱ्या जखमेवर सुखाची फुंकर घातली जाईल. गेल्या वर्षभरापासून मनात असलेली कटूता मिटलेली असेल. 14 फेब्रुवारी हा दिवस त्यांच्यासाठी भविष्यातही सुखद आठवणी घेऊन येणार असेल. विशेष म्हणजे याही वेळी त्यांना आठवतील त्या सुनिताच. कारण त्याच त्यांच्यासाठी मोलाच्या आधार राहिल्या आहेत.
आम आदमी पार्टीला बहुमत मिळाल्याचे दृष्टिक्षेपात आल्यावर अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नी सुनिता यांनाही दिले. यावरुन त्यांच्या आयुष्यातील सुनिता यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आणि त्यांचा व्हॅलेंटाईन स्पेशल ठरला.