आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीच्या वादावरून दिल्लीत अाप-भाजप अामनेसामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-दिल्ली भाजपने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना खाेटारडे ठरवणारी कार्टून जाहिरात प्रकाशित केल्याने पुन्हा नव्या वादाला ताेंड फुटले अाहे. या जाहिरातीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात अाला अाहे. आपचे संयाेजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपने अण्णांची माफी मागावी ही भूमिका घेतली अाहे. तर, भाजपचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू यांनी केजरीवाल यांनी अण्णांच्या विचारांना तिलांजली दिल्याचे या जाहिरातीमधून दाखवण्यात अाल्याचे सांगितले.
भाजपने "चलाे चलें माेदी के साथ' असे म्हणत िदल्लीतील सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांत पहिल्या पृष्ठावर अर्धे पान जाहिरात प्रकािशत केली अाहे. केजरीवाल यांनी मुलांची शपथ घेत काँग्रेससाेबत जाणार नसल्याचे सांगितले हाेते. परंतु त्यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी लग्न लावले असून प्रामाणिकतेचा डंका वाजवणारे केजरीवाल रंग बदलणारे असल्याचे सांगत त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा भाजपने जाहिरातीमधून िदलेला अाहे. अण्णांचा फाेटाे टाकून त्यांच्यावर हार चढवल्याबद्दल केजरीवाल यांनी भाजप यातून काय साध्य करणार अाहे, असा प्रश्न केला.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार भाजपचे
दिल्लीनिवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी एका संस्थेकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार रिंगणातील ११४ उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने केला आहे. फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७३ उमेदवार आहेत. भाजपचे सर्वाधिक २७ उमेदवार, ‘आप’चे २१, तर काँग्रेसचे १२ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
केजरीवालांचा खोटारडेपणा
अरविंदकेजरीवाल हे खोटे बोलण्यात बहाद्दर आहेत. जनता दरबारात हजर राहण्याचे आव्हान आम्ही त्यांना दिले होते. परंतु ते मागील दाराने पळू गेले, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची खिल्ली उडवली. आम्ही काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कधीही सरकार स्थापन करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. परंतु आपल्याच भूमिकेला त्यांनी तिलांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर कारवाई करू म्हणणा-या ‘आप’ने तेदेखील केले नाही.

अाम अादमी पार्टीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया "दिव्य मराठी'शी बाेलताना म्हणाल्या, अण्णा हे ज्येष्ठ सामािजक कार्यकर्ते अाहेत. देशातील जनता त्यांचा अादर करते. अण्णांच्या फोटोला हार घातल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची कीव करावीशी वाटते. अण्णांना उदंड अायुष्य लाभाे, अशी अाम्ही प्रार्थना करताे.