आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेमो की ड्रामा? दिल्ली विधानसभेत ‘अाप’ने ईव्हीएम हॅक करून दाखवले; \'आप\'चे दावे खोटे-निवडणूक आयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीने मंगळवारी पुन्हा दावा केला की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) फेरफार करून निवडणुकीचे निकाल बदलले जाऊ शकतात. हे दाखवण्यासाठी आपने जीएसटी मंजूर करण्यासाठी बोलावलेल्या विधानसभा अधिवेशनाचा वापर केला. आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी ईव्हीएम आणून त्यात फेरफाराचे प्रात्यक्षिक दाखवले. 

तथापि, त्यासाठी वापरलेले मशीन हे निवडणूक आयोगाकडून वापरले जाणारे मशीन नव्हते. कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक असलेले भारद्वाज म्हणाले, ९० सेकंदांत मशीनचा मदरबोर्ड बदलून फेरफार करता येतो. मला जर केवळ तीन तास दिले तर संपूर्ण गुजरातमधील ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपला एकही बूथ जिंकू देणार नाही. 

मूळ प्रश्न : दोन्ही ईव्हीएमचे तंत्रज्ञान सारखे आहे का?
१. आपने जे ईव्हीएम दाखवले ते निवडणूक आयोगाचे नाही. मग या ईव्हीएमचे तंत्रज्ञान खऱ्या ईव्हीएमइतके तगडे आहे का?
२. आपने निवडणुकीदरम्यान मदरबोर्ड बदलणे किंवा विशिष्ट कोड फीड करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, असा कोणताही प्रयत्न केला तर ईव्हीएम तत्काळ लॉक होते.

आपचे दावे पूर्णपणे खोटे : निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आपचे दावे खोडून काढले. असे घडले तर ईव्हीएम मशीन तत्काळ लॉक होते. ते कुणालाही नंतर बदलता येत नाही, असे नमूद केले. असे असले तरी ईव्हीएमवरील शंकांमुळे आयोग चिंतित आहे. दरम्यान, या मुद्द्यार १२ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. 

अामदार भारद्वाज यांनी दाखवला ईव्हीएम फेरफार
१. ईव्हीएम मशीनवर आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी अशी पक्षांची नावे लिहिलेली होती. सौरभ भारद्वाज यांनी सर्व पक्षांना दोन-दोन मते टाकली. मतमोजणीतही या सर्वच पक्षांना दोन-दोन मते मिळाली.

२. मग सांगितले सिक्रेट कोड : सौरभ यांनी सांगितले की, ईव्हीएममध्ये वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे कोड असतात. या माध्यमातून मतदानावेळी फक्त ९० सेकंदात फेरफार करता येऊ शकतो. मतदानाच्या निमित्ताने येऊन कोणीही मशीनमध्ये असे फेरबदल करू शकतात. डेमोसाठी वापरलेल्या ईव्हीएममध्ये आपचा सिक्रेट कोड १२३४१२, बसपाचा १२३४१३, भाजपचा १२३४१४, काँग्रेसचा १२३४१५ आणि सपाचा १२३४१६ होता.

३. नंतर त्यांनी भाजपचा कोड टाकला : सौरभ यांनी भाजपचा कोड ईव्हीएमसारख्या मशीनमध्ये टाकला. यानंतर आपला १०, बसपाला २, भाजपला ३, काँग्रेसला २ आणि सपाला २ मते देण्यात आली. मात्र, निकालात आपला २, बसपाला २, भाजपला ११, काँग्रेसला २ आणि सपाला २ मते मिळाली.
 
हे पण वाचा.. 
बातम्या आणखी आहेत...