आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Assembly Polls Shivsena Contesting 18 Seats Out Of 70

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली: शिवसेनेचे 18 वाघ निवडणुकीच्या रिंगणात, दुस-या फळीतील नेते प्रचारात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनेने दिल्लीतही तेच सुत्र ठेवले आहे. दिल्लीत सर्वच जागांवर निवडणूक लढवू असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मात्र केवळ 18 जागांसाठीच उमेदवार मिळू शकले आहेत. मागील दोन दिवसापासून शिवसेनेचे नेते या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु स्वत: उद्धव ठाकरे प्रचाराला दिल्लीत जाणार नाहीत.
दिल्लीत याआधीही शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका लढविल्या आहेत. केवळ आपले शक्तीप्रदर्शन करायचे एवढाच त्यामागील हेतू आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेचे फाटल्यानंतर यापुढे स्वबळावर निवडणूक लढविण्याची शपथ घेतलेले पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे दिल्ली प्रभारी खासदार चंद्रकांत खैरे आणि दिल्ली प्रदेश अध्यक्ष ओमदत्त शर्मा यांच्यावर दिल्लीची सुत्रे सोपविली आहेत. दिल्लीच्या एकाही मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडूण येऊ शकत नाही याचा अनुभव आणि जाणिव असतानाही केवळ भाजपला व पयार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले अस्तीत्व दाखविण्याचा शिवसेनेचा हा प्रयोग आहे.
उद्धव ठाकरे यांनी बहुतांश मतदार संघातून उमेदवार उभे करण्याचा प्रदेशाध्यक्षाकडे निश्चय व्यक्त केला होता. संधी मिळतात खैरे आणि शर्मा यांनी दिल्लीतील 70 मतदार संघातून उमेदवारांची चाचपणी केली. परंतु कोणीही शिवसेनेकडे तिकिट मागायला आले नाहीत. जे तिकिट मागायला यायचे त्यांना शिवसेनेच्या ‘अटी व शर्ती’ मान्य होत नव्हत्या. अशावेळी केवळ 18 उमेदवार शिवसेना निश्चित करू शकली.
नरेला, बुराडी, सुलतानपूर माजरा, मंगोलपुरी, त्रिनगर, सदर बाजार, किराडी, करोलबाग, राजोरी गार्डन, हरिनगर, तिलकनगर, जनकपूरी, छतरपूर, ग्रेटर कैलाश, पटपटगंज, गांधीनगर, रोहतासनगर व घोण्डा या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीमध्ये मराठी लोकसंख्या चार लाखावर आहे. परंतु एकाही मतदार संघात शिवसेनेला मराठी उमेदवार सापडला नाही.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी 1 फेब्रुवारीपासून प्रचार करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष ओमदत्त शर्मा यांनी सांगितले की, उत्तर भारतीयांच्या विरोधातील शिवसेनेची भूमिका दिल्लीत नडत असते. त्यामुळे शिवसेनेचे तिकिट मिळावे यासाठी उमेदवार उत्सुक नसतात. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला मजबूत पाय रोवायचे असेल तर प्रांतवाद आणि त्यांच्याबाबत विखारी टीका कायमस्वरुपी थांबवावी लागेल.