आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Assemblys Special Session Deputy Cm Manish Sisodia Taking A Nap Inside

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली विधानसभेत उपमुख्यमंत्री सिसोदियांसह अनेक मंत्र्यांची डुलकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- विधानसभेत डुलकी घेताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया)
नवी दिल्ली- दिल्लीत वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती आणि बदलीच्या मुद्द्यावरून केजरीवाल सरकार आणि उपराज्यपाल नजीब जंग यांच्या 'जंग' सुरु आहे. त्यात केंद्र सरकारने दिल्ली सरकारला एक परिपत्रक जारी करून उपराज्यपालांना सर्वाधिकार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे.

दिल्लीत विशेष अधिवेशन मंगळवारी सुरु झाले. पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारने राज्यपालांविरुद्ध महाअभियोग चालवण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतु, या मुद्द्यावरून दिल्लीत रान पेटले असताना 'आप' सरकार किती गंभीर आहे, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह अनेक मंत्र्यांचे छायाचित्रे पाहून लक्षात येते.

मनीष सिसोदिया हे सभागृहात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळ बसले होते. तरी देखील ते डुलक्या घेत होते. सिसोदियासह संदीप कुमार आणि आमदार आसिफ मोहम्मद खान सभागृहात चक्क खुर्चीवर झोपलेले दिसले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, विधानसभेत डुलकी घेणारे 'आप'चे मंत्री आणि आमदारांचे PHOTO...