आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे दिल्लीची बलदंड लेडी बाउन्सर, बारमध्ये रात्री 10 तास करते जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नावाच्या या रेस्तराँचे मालक रियाज अमलानी म्हणतात की, महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊनच आम्ही मेहरुन्निसाला बाउन्सरच्या रूपात जागा दिली. - Divya Marathi
सोशल नावाच्या या रेस्तराँचे मालक रियाज अमलानी म्हणतात की, महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊनच आम्ही मेहरुन्निसाला बाउन्सरच्या रूपात जागा दिली.
नवी दिल्ली - मेहरुन्निसाला पाहून कोणीही अंदाज लावू शकणार नाही की, ती एका सर्वसाधारण भारतीय महिलेप्रमाणे रोज आपल्या कामावर जाते. पण तिचे काम जगावेगळे आहे. ती येथे हौज खास परिसरात एका रेस्तराँ बारमध्ये बाउन्सरचे काम करते. 
 
रात्री 10 तास करते जॉब
- असे काम करणारी कदाचित ती पहिलीच महिला असेल. काळ्या पोशाखात डान्स फ्लोअरवर थिरकणाऱ्या लोकांकडे ती तिची भेदक नजर रोखून पाहते, तेव्हा कुणाचीच काही गैरकृत्य करण्याची हिंमत होत नाही. मेहरुन्निसा शौकत अली मागच्या एक दशकापासून बाउन्सरचे काम करत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून ती रात्री 10 तासांची शिफ्ट करते. रेस्तराँवाले तिला भांडणे सोडवणाऱ्या बाहुबलीच्या रूपात पाहतात.
- या रेस्तराँचे मालक रियाज अमलानी म्हणतात की, महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊनच आम्ही मेहरुन्निसाला बाउन्सरच्या रूपात जागा दिली. दिल्ली हून 200 किमी दूर सहारनपूरमध्ये एका मोठ्या परिवारात मेहरुन्निसाचा जन्म झाला. एकेकाळी आर्मी किंवा पोलिसांत अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न होते, परंतु कुटुंबाने तिला विरोध केला होता. केवळ तिच्या आईमुळेच तिला थोडेफार शिक्षण घेता आले.
 
मेहरुन्निसाला आपल्या कामावर गर्व आहे
- नंतर मेहरुन्निसाच्या आयुष्याने वळण घेतले. वडिलांचे शेअर बाजारात मोठे नुकसान झाले आणि पूर्ण कुटुंब दिल्लीला आले. आता दोन बहिणी आणि मोठ्या बहिणीच्या तीन मुलांसह पूर्ण कुटुंबाच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून मेहरुन्निसाने काम करण्याचा निर्णय घेतला आणि घराची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.
- ती म्हणते - काय फरक पडतो. माझ्या आईवडिलांना तर माझ्यावर विश्वास आहे आणि मीही कुठलेच वाईट काम करत नाहीये. आता तर मेहरुन्निसासोबत तिची बहीणही काम करतेय. दोघी बहिणी मिळून महिन्याकाठी चांगली कमाई करताहेत. त्यांना गर्व आहे की, खासकरून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या निभावत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, बाउन्सर मेहरुन्निसाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...