आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Batala House Encounter Issue Today Decision

बाटला हाऊस चकमक अस्सल; दिल्ली न्यायालयात शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सन 2008 मधील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर बनावट नसल्याचा निर्णय आज (गुरूवार) साकेत कोर्टाने दिला. दहशतवादी संघटना इंडियन मुझाहिद्दीनचा कथित सदस्य शहजाद अहमद याला अखेर दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणी त्याला येत्या 29 जुलैला शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. या एन्काउंटरदरम्यान पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्यावर शहजाद यानेच गोळ्या झाडल्या होत्या, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.
इंडियन मुझाहिद्दीनचा हस्तक असलेल्या शहजाद अहमद याला हत्या आणि अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार शास्त्री यांनी निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 70 जणांची साक्ष तपासण्यात आल्या होत्या.
दोषी ठरवण्यात आलेल्या शहजाद याला फाशीचीच शिक्षा झाला पाहिजे, अशी मागणी शर्मा यांच्या 76 वर्षीय आई देविंदर देवी यांनी केली आहे.

दरम्यान, 19 डिसेंबर 2008 रोजी बाटला हाऊस परिसरातील एका घरात पाच दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.शहजाद अहमद आणि जुनैद पळून जाण्यात यशस्वी झाले होते तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते.मात्र, पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांना वीरमरण आले होते.

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शहजाद उर्फ पप्पू यास उत्तर प्रदेशातील आझमगड येथे अटक केले होते.

शर्मा यांना सात शौर्यपदक देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यात एका राष्ट्रपती पदकाचाही समावेश आहे. शर्मा यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि दोन मुले आहेत. शर्मा 1989 मध्ये दिल्ली पोलिस दलात सहभागी झाले होते.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, 'बाटला हाऊस एन्काउंटर बनावट- दिग्विजयसिंह'