फाइल फोटो : शाहदरा येथील भाजप आमदार जितेंद्र सिंह शंटी (डावीकडे)
नवी दिल्ली - दिल्लीच्या शाहदराचे भाजप आमदार जितेंद्र सिंह शंटी यांच्यावर बुधवारी पहाटे अज्ञात हल्लोखोरांनी हल्ला केला. मात्र शंटी हे गोळीबारात बाल-बाल बचावले. सीसीटीव्ही कॅमे-यात ही घटना कैद झाली आहे. पण अद्याप हल्लेखोरांचा काहीही सुगावा लागलेला नाही. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
कागदपत्रे साक्षांकित करण्याच्या बहाण्याने आले हल्लेखोर
अज्ञात हल्लेखोर सकाळी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आमदारांच्या घरी आले होते. त्यांनी काही कागदपत्रे साक्षांकित करुन घेण्याचा बहाणा करून आमदारांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले. शंटी बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. फायरिंग करत त्यांच्यावर ती गोळ्या झाडल्या. पण आमदार यातून बचावले.
अद्याप पुरावा नाही
हल्लेखोरांनी हेलमेट घातलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यांनी हल्ला का केला, याबाबत माहिती नसल्याचे शंटी यांचे म्हणणे होते. माझे कोणाबरोबरही वैमनस्य नाही. मी कोणाचेही वाईट केलेले नाही. अनेक मुले माझ्याकडे कागदपत्रांवर सही शिक्का घेण्यासाठी येत असतात. त्यामुळेच मी आज दरवाजा उघडला. मी सकाळी लवकर लोकांना भेटायला सुरुवात करतो. त्यामुळे विचार करून हल्ल्याची वेळ ठरवली होती, असे शंटी यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा घटनेचा व्हिडिओ...