आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Cab Driver Accused Of Rape Denied For Identification Parade

कॅबमध्ये बलात्कार : उबरविरोधात धोकेबाजीचा गुन्हा, अधिकार्‍यांना अटक होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइल अॅपच्या मदतीने बुक केलेल्या कॅबमधील बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी टॅक्सी बुकींगची सर्व्हिस पुरविणार्‍या उबर कंपीनीविरोधात सरकारी आदेशांचे उल्लंघन आणि धोकेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍या पीडित तरुणीने उबर कंपनीच्या अॅपच्या मदतीनेच टॅक्सी बुक केली होती. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या कंपनीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कंपनीच्या काही अधिकार्‍यांनाही चौकशीसाठी आज पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. दिल्ली सरकारने सोमवारी उबरच्या सर्व सेवांवर बंदी आणली आहे. उबरसह दिल्लीतील 20 इतर कंपन्यांनाही ब्लॅकलिस्ट करण्याची सरकारी तयारी सुरु आहे.
का दाखल झाला गुन्हा
पोलिसांचे म्हणणे आहे, की उबरने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. उदाहरणार्थ, ड्रायव्हरची कोणतीही चौकशी न करता त्याला कामावर ठेवणे. दिल्लीत शुक्रवारी घडलेल्या दुष्कर्मातील आरोपी शिवकुमार याच्यावर तीन वर्षांपूर्वी देखील बलात्काराचा आरोप होता. या गुन्ह्यात त्याने सात महिने तिहार तुरुंगात शिक्षा देखील भोगली होती. याशिवाय टॅक्सीमध्ये जीपीएस सिस्टीम लावलेली नव्हती. त्यासोबतच उबरने त्यांच्या कंपनीची टॅक्सी सर्व्हिस कायद्यांतर्गत नोंदणी केली नव्हती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांना देणार माहिती
मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्तांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन कॅबमधील बलात्कार प्रकरणाची ताजी माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिल्ली पोलिसांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. डोभाल पंतप्रधानांना या घटनेची माहिती देणार आहेत. तसेच, गृहमंत्री देखील पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी सुरु असलेल्या तपासासंदर्भात माहिती देणार आहेत.
मुंबई पोलिस करणार कॅब ड्रायव्हरची चौकशी
मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर पूर्वी शहरातील सर्व टॅक्सी चालकांची पार्श्वभूमी तपासण्याची मोहिम हाती घेतली आहे. शहरात 45 हजार टॅक्सी चालक आहेत. त्यांच्यावरील गुन्हे, त्यांचे परवाने आणि त्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी क्राइम ब्रँच, स्थानिक पोलिस स्टेशन्स आणि वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.
आरोपी ड्रायव्हर शिवकुमारविरोधात आणखी एक गुन्हा
बलात्काराचा आरोपी शिवकुमार यादववर पोलिसांनी आणखी एक गु्न्हा दाखल केला आहे. उबर कंपनीमध्ये त्याने दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, उबरसह 20 कंपन्या बॅन, तरीही होत राहिली बुकींग