आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी, तीन वर्षांपूर्वीही दुष्कर्म करुन गेला होता तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत एका युवतीवर टॅक्सीमध्ये बलात्कार करणारा आरोपी ड्रायव्हर अशाच एका प्रकरणात तिहार तुरुंगाची हवा खाऊन आला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये पोलिसांनी त्याला चारित्र्य प्रमाणपत्र दिले होते, हे विशेष. दिल्ली पोलिसांनी त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा केला आहे.

(रेल्वेत बलात्कार झाले तर रेल्वे बंद करणार का? गडकरींचा सवाल)
पोलिसांच्या माहितीनुसार, 'आरोपी शिवकुमार यादव याने 2011 मध्ये महरौली येथे दुष्कर्म केले होते. या प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर सात महिने तुरुंगवास झाला होता.' आरोपी शिवकुमारने हा आरोप फेटाळला आहे. या प्रकरणात आपली निर्दोष मुक्तता झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. तर, माध्यमांमधील वृत्तानुसार, आरोपीला ऑगस्टमध्ये पोलिस व्हेरिफिकेशन नंतर चारित्र्याचे प्रमाणपत्र दिल्ली पोलिसांनी दिले होते. यावर दिल्लीचे अतिरिक्त उपायुक्त यांची स्वाक्षरी आहे. दिल्ली पोलिस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले आहे. कारण त्या प्रमाणपत्रावर ज्या अधिकार्‍याची स्वाक्षरी आहे, त्याची नियुक्ती ऑगस्टमध्ये झालीच नव्हती. पोलिसांनी कॅब कंपनी उबरवर धोकेबाजीचा आरोप करत कंपनीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

(उबरसह 20 कंपन्या बॅन, तरीही होत राहिली बुकींग)
अॅपच्या माध्यमातून उबर देत आहे धोका
दिल्लीच्या परिवाहन विभागाने उबर कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. त्यांनी म्हटले आहे, की कंपनी त्यांच्या अॅपने ग्राहकांची दिशाभूल करत आहे. जवळपास 2,480 अब्ज रुपये मुल्य असलेली ही कंपनी अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथून चालवली जाते. ही कंपनी स्मार्टफोनच्या माध्यमातून कॅब बुकींगची सर्व्हिस पुरवते. मात्र, त्यांच्या तंत्रज्ञानात मुलभूत कमतरता आहेत. त्यामुळेच नेदरलँडमध्ये या कंपनीच्या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने त्यांच्या कॅबमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते असा दावा केला होता. मात्र, उबरकडे स्वतःच्या कार आणि ड्रायव्हर नसल्याचे अनेक माध्यमांतील वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे. बलात्कारतील आरोपीचीही स्वतःची कार होती. त्याला कंपनीकडून बुकींगची माहिती मिळाली होती.
अशा प्रकारच्या बुकींग होणार्‍या कारमध्ये जीपीएस यंत्रणा गरजेची नाही. कंपनीने यामध्ये आमची फक्त मध्यस्थाची भूमिका असते असा पवित्रा घेतला आहे. बलात्काराच्या या घटनेवर कंपनीचे सीईओ ट्रॅव्हिस कॅलेनिक म्हणाले, 'भारताच्या परिवहन परवाना यंत्रणेतच कमतरता आहेत. त्यात ड्रायव्हरची पार्श्वभूमी समजण्याची व्यवस्थाच नाही.'
आरोपी म्हणाला, चूक झाली आता काय करु?
दिल्लीत शुक्रवारी रात्री उबर कंपनीच्या अॅपद्वारे मागवलेल्या टॅक्सीमध्ये ड्रायव्हरने 27 वर्षीय बहुराष्ट्रीय कंपनीत एक्झीकिटीव्ह असलेल्या तरुणीवर अत्याचार केला होता. आरोपीला सोमवारी तीस हजारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी माध्यमांनी त्याला घेरुन प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. आता मी काय करु? मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अंबिका सिंह यांनी त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरोपी शिवकुमारला कोर्टात हजर करताना पोलिसांचा बंदोबस्त आणि नागरिक व माध्यमांची गर्दी