आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांच्‍या जिभेवर शस्त्रक्रिया, ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून होता कफाचा त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा घसा आणि पडजिभेवर बेंगळुरू येथील नारायण हेल्थसिटी हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पुढचे काही दिवस ते बोलू शकणार नाहीत. केजरीवाल यांना मागील ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कफाचा त्रास आहे. हा त्रास दूर करण्यासाठीच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबत हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले, की केजरीवाल यांच्या तोंडाच्या आकाराच्या तुलनेत जिभेसाठी खुपच कमी जागा होती. टाळू आणि पडजीभ यांचा आकार थोडा जास्त होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच तोंडातील या रचनेमुळे त्यांना वारंवार खोकल्याचाही त्रास उद््भवत होता. याचे निदान करून त्यांचया घशावर व पडजिभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तोंडाच्या वरच्या भागात एक छोटी मांशपेशी असते. त्याचा आकारही शस्त्रक्रियेद्वारा व्यवस्थित करण्यात आला. डॉक्टर पॉल सी. सालिन्स यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सोशल मीडिया पर आए रिअॅक्शंस
बातम्या आणखी आहेत...