आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Cm Arvind Kejariwal Meet To Anna Hajare In Maharashtra Sadan At Delhi

अरविंद केजरीवालांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे महाराष्ट्र सदनात शनिवारी रात्री उशिरा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांची ही सदिच्छा भेट होती व ती सुमारे 20 मिनिटे चालल्याचा दावा ‘आप’च्या प्रवक्त्याने केला. गंमत म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या काही तास आधीच अण्णांनी केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. ‘आप’चे माध्यम प्रतिनिधी दीपक वाजपेयी यांनी सांगितले की, केजरीवाल यांनी अण्णांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, या दोन नेत्यांमध्ये कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा झाली, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. अण्णांनी पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतरही साधी स्लीपर वापरतात. याउलट काही नेते दिलेले आश्वासन पाळत नाहीत, शब्द दिल्यानंतरही बंगल्यात राहायला जातात, असे अण्णा म्हणाले होते. त्यांच्या टीकेचा रोख केजरीवालांवरच होता. हजारे यांनी नंतर बोलताना आपण मार्चअखेरपासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशव्यापी यात्रा करणार असल्याची माहिती दिली.