आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi CM Arvind Kejariwal Was Proposed For Role In Dirty Politics Movie News In Marathi

...तर \'डर्टी पॉलिटिक्स\'मध्ये झळकले असते दिल्लीचे CM; केजरीवालांना मिळाली होती ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‍दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना बॉलिवूडचा सिनेमा 'डर्टी ‍पॉलिटिक्स'मध्ये भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती, अशी माहिती मिळाली आहे. केजरीवाल यांनी ही ऑफर स्विकारली देखील होती. मात्र, नंतर काही कारणास्तव त्यांनी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
मिळालेली माहिती अशी की, ‘डर्टी पॉलिटिक्स’चे निर्माते के.सी. बोकाडिया यांनी अरविंद केजरीवाल यांना एका सामजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेची ऑफर दिली होती. सुरुवातीला केजरीवाल यांनी ही ऑफर फेटाळली होती. नंतर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलेली भूमिका साकारण्यास केजरीवाल यांनी होकार दिला होता. सिनेमाचे दिग्दर्शकांनी केजरीवाल यांना यासंदर्भात एक ईमेलही पाठवल्याचे काही दिवसांपूर्वी मल्लिकाने सांगितले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, केजरीवाल सिनेमात असते तर कदाचित मी सिनेमात दिसले नसते- मल्लिका शेरावत