आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi CM Arvind Kejriwal Leaves For Punjab, Women Protest Against Arvind Kejriwal At The Station

पंजाबला निघालेल्या केजरींविरोधात स्टेशनवर आंदोलन, AAP चा दावा हा प्री-प्लॅन हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप महिला कार्यकर्त्यांनी केजरीवालांना बांगड्या दाखवल्या. - Divya Marathi
भाजप महिला कार्यकर्त्यांनी केजरीवालांना बांगड्या दाखवल्या.
नवी दिल्ली - पंजाब दौऱ्यावर निघालेल्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुरुवारी दिल्ली स्टेशनवर आंदोलन झाले. आरोप आहे की सेक्स सीडीमध्ये अडकलेले संदीपकुमार प्रकरणात जाब विचारत भाजप महिला कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना धक्काबुक्की केली.
आपचा दावा - पूर्वनियोजित हल्ला
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन दिल्ली पोलिस आणि भाजपवर हल्ला केला. ते म्हणाले, 'दिल्ली पोलिसांसमोर धक्काबुक्की झाली आणि त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. चॅनलवाल्यांना आधीच बोलावून घेण्यात आले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वकाही प्री-प्लॅन होते.' आपने हे विरोधी आंदोलन नसून पूर्वनियोजित षडयंत्र रचून केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे.
रस्ता अडवून घोषणाबाजी, बांगड्या फेकल्या
- केजीरवाल गुरुवारी सकाळी पाच दिवसांच्या पंजाब दौऱ्यासाठी नवी दिल्ली रेल्वेस्टेशनवरुन शताब्दीने रवाना झाले.
- मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा ते स्टेशनवर पोहोचले तेव्हा तिथे आधीपासून उपस्थित असलेल्या महिलांनी घोषणाबाजी सुरु केली. केजीरवालांना बांगड्या दाखवत त्यांचा रस्त्या अडवण्याचा प्रयत्न झाला.
- बराचवेळ केजरीवाल आंदोलकांच्या गराड्यात अडकले होते. अखेर पोलिसांनी कसेबसे त्यांना त्यातून बाहेर काढले आणि रेल्वेत बसवून दिले.
- केजरीवाल रेल्वेत बसल्यानंतरही महिलांची घोषणाबाजी सुरु होती. काही महिला घोषणादेत प्लॅटफॉर्मवरही धावल्या.
- यामुळे रेल्वेस्टेशनवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
संदीपकुमार सेक्स स्कँडलविरोधात भाजपचे आंदोलन
- अशी माहिती आहे की भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी संदीप कुमारच्या सेक्स सीडी कांडाविरोधात आणि त्यावर आप प्रवक्ते आशुतोष यांनी लिहिलेल्या ब्लॉगविरोधात हे आंदोलन होते.
- सेक्स सीडी स्कँडलमध्ये माजी मंत्र्याचा बचाव केल्याचा आरोप आशुतोष यांच्यावर आहे. या प्रकरणात आज त्यांना महिला आयोगासमोर हजर व्हायचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आंदोलकांच्या गराड्यात अडकले केजरीवाल
> कोण आहे संदीपकुमार
> रोज पत्नीच्या पाया पडतात सेक्स टेपमध्ये फसलेले संदीपकुमार
बातम्या आणखी आहेत...