आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi CM Arvind Kejriwal Along With Deputy CM Manish Sisodia & Chief Secy KK Sharma Meets LG Najeeb Jung Ahead Of Special Assembly Session.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत उपराज्यपालांविरुद्ध \'महाभियोग\' चालवण्याचा \'आप\'चा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी उपराज्यपालाविरुद्ध 'महाभियोग' चालवण्याचा प्रस्ताव सादर केला. राज्यपालां‍विरोधात महाभियोग चालवण्याची तरतूद केंद्राप्रमाणेच राज्य सरकारमध्येही असावी, अशी मागणी 'आप'ने केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती आणि बदलीच्या मुद्द्यावरून केजरीवाल सरकार आणि नजीब जंग यांच्यात जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर नजीब जंग यांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला हवा, यासाठी ही मागणी केली जात आहे. यासाठी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचेही दिल्ली सरकारने म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आज (मंगळवार) सुरवात झाली. यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्य सचिव के.के. शर्मा उपस्थित होते. त्यामुळे दिल्लीतील 'जंग' संपण्याची आशा निर्माण झाली आहे.
केजरीवाल सरकारने बोलावले विशेष अधिवेशन
वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती आणि बदलीचे सर्वाधिकार उपराज्यपाल जंग यांना असल्याचे केंद्र सरकारने स्पष्टीकरण केले आहे. यासाठी केंद्र सरकारने दिल्ली सरकारला एक परिपत्रक पाठवले आहे. केंद्र सरकार दादागिरी करत असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्‍यासाठी दिल्ली सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने पाठवलेल्या परिपत्रकाविरुद एक प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हायकोर्टचा दिल्ली सरकारला दिलासा...