आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi CM Arvind Kejriwal Praises PM Narendra Modi For India\'s Surgical Strike Operation

केजरी म्हणाले- मोदींसोबत अनेक मुद्द्यांवरुन मतभेद, मात्र सर्जिकल स्ट्राइकसाठी त्यांना सॅल्यूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ मॅसेज जारी करुन नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. - Divya Marathi
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ मॅसेज जारी करुन नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ मॅसेज जारी करुन नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल म्हणाले, 'मोदींसोबत आमचे अनेक मुद्यांवरुन मतभेद आहेत. मात्र लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी त्यांना सॅल्यूट करतो.' संसदेतील प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनीही या मुद्द्यावर पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते.
केजरीवाल म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी बॉर्डरवर आमचे 19 जवान शहीद झाले होते. मात्र गेल्या आठवड्यात आमच्या सैनिकांनी धैर्याने याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले.'
-'माझे पंतप्रधानांसोबत एक नाही शंभर मुद्द्यांवर मतभेद असू शकतात. मात्र याठिकाणी पंतप्रधानांनी जी इच्छाशक्ती दाखविली त्यासाठी त्यांनी सॅल्यूट करतो.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, केजरींचा VIDEO
बातम्या आणखी आहेत...