आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi CM Arvind Kejriwal Unhappy With Ex Law Minister Jitendra Tomar

तोमर यांच्या हकालपट्टीची शक्यता, AAP चा आणखी एक आमदार वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या ताब्यात असलेले जितेंद्र तोमर. - Divya Marathi
पोलिसांच्या ताब्यात असलेले जितेंद्र तोमर.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या सरकारमधील माजी कायदेमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्यावर नाराज असल्याचे समजते आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी सकाळी काही जुने ट्विट्स रिट्वीट केले. त्यावरून तोमर यांनी केजरीवाल यांना खोटी आरटीआय दाखवत फसवल्याचे स्पष्ट होत आहे. तोमर यांना पक्षातून काढण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. दरम्यान आपचे करोल बागचे आमदार विशेष रवी यांच्या पदवीबाबतही वाद सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

तोमर यांच्यावर जेव्हा सर्वप्रथम बनावट पदवी प्रकरणी आरोप आणि या प्रकरणात समन्स जारी झाले होते, त्यावेळी केजरीवाल यांना तोमर यांनी आरटीआयचे काही कागदपत्र दाखवले होते. ते बनावट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार तोमर यांच्या प्रकरणी ‘आप’ नेत्यांनी एक बैठक घेतली आहे. त्यात तोमर यांचे प्रकरण ‘आप’च्या अंतर्गत लोकपालकडे चौकशीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच लवकरच तोमर यांची हकालपट्टी केली जाण्याचीही शक्यता आहे.

तोमर यांनी बिहारला घेऊन जाणार
तोमर यांना पोलिस बिहारला घेऊन जात आहेत. दिल्ली पोलिस त्यांना मुंगेरच्या विश्वनाथ सिंह इन्स्टीट्यूट ऑफ लीगल स्टडी कॉलेज आणि भागलपूरच्या तिलका मांझी युनिव्हर्सिटीत घेऊन जाणार आहेत. त्याठिकाणी त्यांच्यासमोरच पदवीची पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वी तोमर यांनी पोलिस फैजाबादच्या केएस साकेत पीजी कॉलेज आणि आरएमएल अवध विद्यापीठातही घेऊन गेले होते. त्याठिकाणी त्यांच्या बीएससीच्या पदवीचे व्हेरीफिकेशन करण्यात आले. दरम्यान कोर्टानेही तोमर यांना दिलासा दिलेला नाही. अंतरीम जामीनाबाबत त्यांची सुनावणी 16 जूनवर ढकलली आहे.
रवी हेही अडचणीत?
तोमर यांच्यापदवीवरून एवढे वाद सुरू असतानाच, आपचे आणखी एक आमदार विशेष रवी यांच्या शिक्षणावरुनही वाद सुरू झाला आहे. रवी हे करोल बाग मतदारसंघाचे प्रतिनिझीत्व करतात. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये शिक्षणाचे वेगवेगळे उल्लेख असल्याचे समोर आले आहे. त्यांनी 2013 साली B.com पर्यंत शिक्षण झाल्याचा उल्लेख केला आहे, तर 2015 च्या प्रतिज्ञापत्रात B.A. (IGNOU) असा उल्लेख आहे. तोमर यांच्या पाठोपाठ आणखी एका आमदाराच्या शिक्षणाचा वाद सुरू झाल्याने आपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.