आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने घेतला व्हीआरएस, वाचा Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भारतीय राजस्व सेवेतून (आयआरएस) स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. प्राप्तीकर विभागात सुनीता यांनी 22 वर्षे सेवा दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता सध्या दिल्लीतील प्राप्तीकर आयुक्तपदावर कार्यरत होत्या. यंदाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्वेच्छा सेवा निवृत्तीचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने अधिकृत जाहीर केले आहे. सुनीता केजरीवाल यांना 15 जुलैपासून प्रशासकीय सेवेतून मूक्त करण्यात येणार असल्याचे पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मिळेल पेन्शनचा लाभ...
एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, सुनिता केजरीवाल यांनी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल.

सुनिता 1993च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी आहेत. सुनिता व अरविंद केजरीवाल यांची पहिली भेट भोपाळ येथील प्रशिक्षण कार्यक्रमात झाली होती. नंतर दोघांमध्ये प्रेम जुळले व विवाहाच्या बंधनात अडकले.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, अरविंद केजरीवाल यांची एक छोटीशी लव्हस्टोरी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...