आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi CM Sheela Dixit Comment On Corruption Issue

मलाही लाच देण्याचा प्रयत्न झाला होता- शीला दीक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्याचा असा खुलासा दस्तुरखुद्द त्यांचीच केला आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना शीला दीक्षित यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे उमेदवारी मिळवी म्हणून ही लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे शीला दीक्षित यांनी सांगितले.

दीक्षित म्हणाल्या की, एक व्यक्ती त्यांना भेटायला आला होता. त्याच्याकडे एक प्लॉस्टिक बॅग होती. ती बॅग दीक्षित यांना देण्यासाठीच त्याने आणली होती. बॅगमध्ये मिठाई असेल असे वाटले होते. परंतु ती बॅग रुपयांनी भरलेली असल्याचे संबंधित व्यक्तीने दीक्षित यांना सांगितले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून तो रुपयांनी भरलेली बॅग घेऊन शीला दीक्षित यांच्याकडे आला होता. या घटनेमुळे शीला दीक्षित यांना खूप मनस्ताप झाला होता.

दीक्षित म्हणाल्या की, असे कारस्थान करणार्‍यांना कडक ‍शिक्षा झाली पा‍हिजे. परंतु दीक्षित यांनी संबंधित व्यक्तीचे नाव सांगण्यात नकार दिला. तसेच सीडब्ल्यूसी घोटाळ्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली काय? या प्रश्नाला उत्तर देताना दीक्षित म्हणाल्या की, घोटाळ्यामुळे सरकारच्या प्रतिष्‍ठेला कोणताही धोका पोहचलेला नाही. तसेच त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांवर त्यांनी सरकारकडे यापूर्वी स्पष्टीकरण दिले होते. सीएजीने त्यांना क्निनचिट दिली होती.