आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Congress Delegates Pass Resolution Requesting Rahul Gandhi To Take Over As AICC Pres

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची तयारी; पहिल्यादाच पक्षाकडून प्रस्ताव पारित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीनंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. - Divya Marathi
दिवाळीनंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसच्या दिल्ली युनिटने एक प्रस्ताव पारित करत राहूल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. दिल्ली काँग्रेसच्या नव्याने निवड झालेल्या 280 सदस्यांनी हा प्रस्ताव पारित केला आहे. राहुल गांधी हे सध्या पक्षाचे उपाध्यक्ष असून लवकर ते काँग्रेसचे अध्यक्ष बनतील.

मनमोहन यांच्या उपस्थितीत पारित करण्यात आला प्रस्ताव
- दिल्ली प्रदेश काँग्रेस सदस्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
- याशिवाय प्लॅस्टिकचे वरिष्ठ नेते जनार्दन त्रिवेदी, पी. सी. चाको, जे. पी. अग्रवाल आणि सज्जन कुमार या बैठकीला उपस्थित होते. प्रस्तावाचे सर्व सदस्यांनी हात उंच करुन समर्थन केले.
 
दिवाळीनंतर राहुल स्वीकारतील पदभार
- राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट याच आठवड्यात म्हणाले होते की, राहुल हे दिवाळीनंतर पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारु शकतात. ही काळाची गरज आहे की त्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. पक्षातून यासाठी खूप काळापासून मागणी होत आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...