आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : राजन आज भारतात ? म्‍हटले, पोलिसही करतात दाऊदचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडोनेशियातील बालीत अटक करण्‍यात आलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची चौकशी मुंबई पोलिस नव्हे, दिल्ली पोलिस करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळे छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे राजनला भारतात आणण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकार्‍यांसह दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी बाली येथे गेले आहे. दरम्‍यान, मुंबई पोलिस दलातही काही अधिकारी, कर्मचारी दाऊदसाठी काम करत असल्‍याचा आरोपही राजन याने केला.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजनला आज (मंगळवारी) भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. राजनला भारतात आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्‍यात येणार आहे. गृहमंत्रालयाने राजनच्या चौकशीची पूर्ण तयारी केली आहे. अंडरवर्ल्ड डान दाऊद इब्राहिमविरुद्ध राजनकडून गोपनीय माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.


चौकशीची पद्धत शोधली...
मिळालेली माहिती अशी की, राजनने 2010 मध्ये दिल्लीतील एका बिझनेसमनला खंडणीसाठी फोन केला होता. याशिवाय राजन विरुद्ध दिल्लीत एकूण सात गुन्हे आहेत. दिल्लीतील पोलिसातील दोन अधिकारी बालीला पोहोचले आहेत. त्यांच्याकडे राजन विरुद्धात दस्ताऐवज आहे. या गुन्ह्यांच्या आधारावर राजनची चौकशी करण्‍यात येणार आहे.

राजनची चौकशी मुंबई पोलिसांकडून का नाही?
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देशाबाहेर प्रकरणी सीबीआय हाताळते. परंतु, राजनला भारतात आणण्यासाठी सीबीआयसोबत दिल्ली पोलिस अधिकारी गेले आहेत. राजनविरुद्ध सगळ्यात जास्त गुन्हे मुंबईत आहेत. त्यामुळे राजनला आणण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेणे अपेक्षित होते. परंतु, इंटेलिजन्स एजन्सीचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. मुंबई पोलिसांची प्रतिमा आधीच डागाळली आहे. 2005 मध्ये एक सीक्रेट ऑपरेशन करण्यात येणार होते. या ऑपरेशनमध्ये छोटा राजनचा पंटर विकी मल्होत्रा व फरीद तनाशना यांच्या मदतीने इंटेलिजन्स एजन्सी ‘एक मोठे काम’ करणार होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या कामात दिरंगाई केली. मुंबई पोलिस व डी-कंपनी संपर्कात आहे. त्यामुळे डी कंपनीकडून टिपनंतर मुंबई पोलिसांनी इंटेलिजन्स एजन्सीला हे ऑपरेशन गुंडाळण्यास भाग पाडले होते.

दुसरीकडे, मुंबई पोलिस व डी कंपनीत लिंक असल्यामुळे खुद्द छोटा राजनने म्हटले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने राजनची चौकशीची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवल्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.