आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Court Concludes Trial Against Four Adult Accused Verdict For September 10

दिल्ली गँगरेप : सुनावणी पूर्ण, आरोपींना 10 सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली गँगरेप प्रकरणातील चार आरोपींची जलदगती न्यायालयातील सुनावणी आज (मंगळवार) पूर्ण झाली असून न्यायालयाने 10 सप्टेंबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याची रवानगी सुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.

(शक्तीमिलमधील आणखी एक बलात्कार उघड, अटकेतील गँगरेप आरोपींचेच कृत्य )

गेल्या वर्षी 16 डिंसेंबर रोजी पॅरामेडिकलच्या एका विद्यार्थिनीवर दिल्लीत धावत्या बसमध्ये सहा जणांनी बलात्कार केला होता. संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध केला होता. देशाची राजधानी महिलांसाठी असुरक्षित असल्याची टिका गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली. संसदेतही या प्रश्नावर खासदारांनी आवाज उठवला होता. सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे सांगितले होते.

या प्रकरणातील सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील एक अल्पवयीन होता, तर या सामूहिक बलात्कारातील रामसिंह या आरोपीने मार्च 2013 मध्ये तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. उर्वरित चौघा आरोपींची सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली असून कोर्टाने 10 सप्टेंबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे.