आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनौरस मुलाच्या देखभाल खर्चातून सुटका नाही - न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनौरस मुलाच्या जन्माआधी त्याच्या आईसोबत तडजोडीचा करार झाला असला तरीही मुलाच्या जन्मानंतर त्याच्या देखभालीच्या खर्चातून वडिलाची सुटका होऊ शकत नाही, असा निकाल येथील न्यायालयाने दिला आहे.मुलाच्या जन्माआधी आईसोबत केलेल्या 50 हजार रुपयांच्या एकरकमी करारामुळे आपल्यावर त्याचा खर्च करण्याची कोणतीही जबाबदारी राहत नसल्याचा युक्तिवाद पित्याने केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुराधा शुक्ला भारद्वाज यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. कराराबाबत काही वाद आहेत. त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीत मुलाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुलाच्या जन्माच्या दाखल्यात संबंधित व्यक्तीचा उल्लेख ‘वडील’ असा होता. जन्माशी संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर हा आदेश बजावला.