आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुराडी मर्डर: आरोपी म्हणाला- करुणाने केली होती थट्टा, तुला चाकूही निट चालवता येत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेंद्र आणि करुणा यांचा एकत्र काढलेला फोटो. - Divya Marathi
सुरेंद्र आणि करुणा यांचा एकत्र काढलेला फोटो.
नवी दिल्ली - राजधानीतील बुराडी मर्डर केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. करुणावर कैचीने 90 सेकंदात 26 वार करणाऱ्या आरोपीनेच पोलिसांना कॉल केला होता. 100 क्रमांकावर फोन करुन सुरेंद्रने म्हटले, 'मी एका मुलीचा खून केला आहे.' त्यानंतर थोड्यावेळात एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना रस्त्यावर झालेल्या मर्डर थराराची माहिती दिली. सुरेंद्रने चौकशीत हे देखील सांगितले, 'करुणाला घाबरवण्यासाठी मी सुरुवातीला तिच्या बॅगवर वार केला होता. तेव्हा माझी थट्टा करत ती म्हणाली, तूला चाकूही व्यवस्थित चालवता येत नाही. तेव्हाच मी तिला धडा शिकवण्याचे ठरवले आणि कैचीने तिला भोसकले.'
आरोपीचा दावा तीन वर्षांपासून अफेअर...
घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या सुरेंद्रने 21 वर्षीय करुणावर भररस्त्यावर 90 सेकंदांत 26 वार केल्याने काल मोठी खळबळ उडाली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याचे गांभिर्य जगासमोर आले होते. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे आधी सांगण्यात आले होते. पण या मागचे सत्य आज उघडकीस आले आहे. सुरेंद्र आणि करुणा दोघे लिव-इनमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ती त्याला टाळत होती. तिचे दुसऱ्या मुलासोबत अफेअर सुरु असल्याचा संशय सुरेंद्रला होता. त्याच्याजवळ तिच्या फेसबुक अकाऊंटला पासवर्ड होता. त्याने तिचे फेसबुक अकाऊंट ओपन करुन बघितले. तर तिने एका मुलाला तिचा न्युड फोटो पाठवला होता. तसेच त्याच्यासोबत अश्लिल संभाषणही केले होते. हे बघून सुरेंद्र चांगलाच संतापला. त्याने तिला कैचिने भोसकून संपवले.

सुरेंद्रसिंह (३४) काल बुराडी परिसरात दुचाकीवरून आला. या वेळी पायी जाणाऱ्या करुणाला त्याने अडवले आणि कात्रीने सपासप वार करत राहिला. त्याचा हा हल्ला सुरू असताना जाणारे-येणारे लोकही बघत राहिले. सुमारे ९० सेकंद हा तरुण अमानुषपणे तरुणीवर वार करत होता.

यादरम्यान दोन लोकांनी पुढे जाऊन सुरेंद्रला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, धमकावून सुरेंद्रने त्यांना पिटाळून लावले. पोलिसांनी सांगितले, या वेळी कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. काही लोकांनी नंतर सुरेंद्रचा पाठलाग करून त्याला पकडले. मारहाण करून त्याला पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, करुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोवर ती गतप्राण झाली होती.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली असून सुरेंद्रने करुणाला अडवल्याचे व नंतर तिच्यावर वार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिच्या पोटावर, मानेवर व चेहऱ्यावर हे वार करण्यात आले आहेत. करुणा अजूनही जिवंत आहे हे पाहून थोडा वेळ थांबलेल्या सुरेंद्रने पुन्हा तिच्यावर तीन वार केले आणि तिला संपवले.

करुणा एका शाळेत शिक्षिका होती. एक कॉम्प्युटर सेंटर चालवणाऱ्या सुरेंद्रशी तिची दीड वर्षांपासून ओळख होती. यादरम्यान ती सेंटरमध्ये कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी केली होती.
शेवटच्या स्लाइडवर पाहा हत्येचा अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ...
(नोट - या व्हिडीओतील घटना तुम्हाला विचलित करु शकते... कृपया कमकुवत हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ बघू नये.)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...