नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीने आपल्या नराधम पित्यांची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जन्मदाता पिता आपल्या मुलेचे लैंगिक शोषण करत होता. यामुळे मुलीने त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे पित्याची हत्या करण्यासाठी तिने आपल्या दोन मित्रांची मदत घेतली. दलजीतसिंग असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुणी कुलविंदर कौर हिच्यासह दोन मित्रांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी कुलविंदर कौर हिने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने जन्मदात्या पित्याची हत्या केली. तिघांनी दलजीतसिंग यांना क्रिकेट स्टंपने मारहाण केली. त्यात दलजीतसिंगांचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर तिघांनी दलजितसिंगांची छाती चिरून ह्रदयाशी जोडलेला पेसमेकर काढून घेतला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'लैंगिक शोषण करत होता जन्मदाता'