आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्‍या घराकडे जाणाऱ्या \'आप\'च्‍या 52 आमदारांना सोडले, रिजिजू- ही तर ड्रामेबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्‍लीमध्‍ये भाजप आणि आम आदमी पक्षातील (आप) संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शनिवारी 'आप'चे आमदार दिनेश मोहनिया यांना अटक केल्‍यानंतर रविवारी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदियांसह 52 आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्‍यात घेऊन सोडले. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या घरी सरेंडर करण्‍यास जात होते.

सिसोदिया यांच्‍यावर काय आहे आरोप...
> दिल्लीच्‍या गाजीपूर भाजी बाजार व्‍यापारी संघटनेने मनीष सिसोदिया यांच्‍या विरुद्ध तक्रार दिली. त्‍याला आम आदमी पक्षानेही तसेच उत्‍तर दिले.
> दरम्‍यान, दिनेश मोहनिया यांना विनयभंगाच्‍या आरोपात शनिवारी पोलिसांनी अटक केली.
> त्‍यावर मनीष यांनी ट्वीट करून म्‍हटले - ''मोदीजी तुमची शत्रुता आमच्‍याशी आहे. आम्‍हाला अटक करा; पण दिल्‍लीच्‍या विकासात अडथळा आणू नका. आम्‍ही सगळे तुमच्‍या घरी येऊन शरणागती पत्‍कारतो. मला आशा आहे तुम्‍ही हिंसा, छेडछाड या शिवाय आणि इतर आरोपात मला अटक करण्‍याची पूर्णपणे व्‍यवस्‍था कराल. ''
> त्‍यांच्‍या या ट्वीटनंतर 7 रेसकोर्स परिसरात जमावबंदी (कलम 144) लागू करण्यात आली होती.
> असे असताना मनीष आणि आपचे काही कार्यकर्ते रविवारी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे शरणागती पत्‍करण्‍यासाठी जात होते. पण, या सर्वांना तुघलक रोडवर ताब्‍यात घेण्‍यात आले.
दिनेश मोहनिया यांना पत्रकार परिषदेतून केली अटक
महिलांसोबत गैरवर्तन आणि ज्येष्ठ नागरिकाला थप्पड लगावण्याचा आरोप असलेल्या आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दुपारी पोलिसांनी पत्रकार परिषद सुरु असताना अटक केली. मोहनिया यांनी ही पोलिसांची दादागिरी असल्याचे म्हटले.
काय आहे प्रकरण
> अटकेच्या वेळी दिनेश मोहनिया म्हणाले, 'ही पोलिसांची गुंडगिरी आहे. भाजप एम.एम.खान यांच्या हत्याकांडावरुन लक्ष विचलित करण्यासाठी असे करत आहे.'
> मोहनिया यांच्यावर दोन दिवसांमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
> मोहनिया यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात ते पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
किरण रिजिजू म्‍हणाले ही तर ड्रामेबाजी
या प्रकरणी केंद्राचे गृहराज्‍यमंत्री किरण रिजिजू म्‍हणाले, पंतप्रधानाकडे खूप काम आहे. ते जर केजरीवाल यांच्‍या प्रत्‍येक प्रश्‍नांचे उत्‍तर देत बसले तर काम कधी करणार. 'आप' ड्रामेबाजी करत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)