आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Economics Conclave 2015 Modi Gives His Vision

मोदी म्हणाले- 17 महिन्यांपेक्षा आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील अर्थव्यवस्था 17 महिन्यांपूर्वीपेक्षा अधिक चांगली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. दिल्ली इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह 2015 मध्ये शुक्रवारी पंतप्रधान उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी जन-धन मोबाइल योजनेसाठी JAM हा नवा मंत्र दिला. ते म्हणाले, JAM म्हणजे जस्ट अचिव्हिंग मॅक्झिमम अर्थात सर्वाधिक प्राप्त करणे. यावेळी पंतप्रधान मोदींनी दावा केला, की 17 महिन्यांपूर्वी आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जशी होती, आज त्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितित आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा उपस्थित होते.

पंतप्रधान आणखी काय म्हणाले
> रिफॉर्म्सच्या आमच्या योजनांमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद आहे. जन-धन योजनेने गरीबांना इलेक्टॉनिक पेमेंट करण्याचे बळ दिले आहे.
> कोणी मान्य करा अथवा नका करु, पण जन-धन योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमध्ये 26 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. 17 महिन्यात 12 कोटी लोकांना बँक व्यवहराशी जोडण्यात आले.
> जागतिक अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या या यशामागे गांभीर्यपूर्वक तयार केलेल्या योजना आहेत.
> आम्ही सोन्यासंबंधी (Gold) अनेक योजना आणल्या आहेत. डिझेल अनुदानात कापत केली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन आधी तोट्यात होते, आमच्या सरकारने ते नफ्यात आणले आहे. आम्ही बँकांमध्ये उच्च पदांवर स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी दिली आहे.
> महसूल वाढत आहे आणि व्याजदर कमी होत आहे. रुपया स्थिर आहे.
> जीडीपीमध्ये वाढ होत आहे आणि महागाई कमी होत आहे. विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

> महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही प्रथमच आरबीआयसोबत मॉनिटरी फ्रेमवर्क तयार करत आहोत.
> उद्योग उभे करण्यासाठीची ताकद भारतात आहे. त्यामुळे गरज आहे आपण नोकऱ्या निर्माण करणाऱ्या देशांच्या यादीत असले पाहिजे.
> रिफॉर्म त्याला म्हणता येईल ज्यामाध्यमातून गरीबांना चांगले जीवनमान मिळण्यास मदत होईल. हेच सबका साथ-सबका विकास आहे.
> नोकरदारांसाठी आम्ही नवी योजना आणली आहे. त्यामुळे नोकरदाराने कंपनी बदलली तरी त्याचा यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर कायम राहिल.
> रस्ते महामार्ग तयार करण्याची योजना वेगात सुरु आहे. 2012-13 मध्ये हा वेग दररोज 5.2 km होता. 2013-14 मध्ये दररोज 8.7 km होता. आता हा वेग दररोज 23.4 km आहे.
> पंतप्रधान होण्याआधी नवनिर्मीतीच्या अनेक कल्पना मला तज्ज्ञांनी दिल्या, मात्र एकानेही स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला नाही.
> पेन्शनर्सला ह्यात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या त्या आम्ही बंद केल्या आहेत. त्यासाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान आणले.