आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election 2015 Will Kill Anti Nationals Like Kejriwal Swami Omji News In Marathi

\'केजरीवाल को मार डालूंगा\'; पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय अपक्ष उमदेवाराने दिली धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार ओम स्‍वामी यांनी 'आप' संयोजक आणि उमेदवार अरविंद केजरीवाल यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. केजरीवाल हे देशाचे शत्रु असल्याचे ओम स्वामी यांनी म्हटले आहे. ओम स्वामी यांनी
स्वत:ला हिंदू महासभेचे समर्थक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्याची म्हटले आहे.

मिळालेली माहिती अशी की, नवी दिल्लीतून ओम स्वामी यांनी अरविंद केजरीवाल यांना आव्हान दिले आहे.बासरी हे ओम स्वामी यांचे निवडणूक चिन्ह आहे. आपण ओम साईजी पक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे देखील ओम स्वामी यांनी म्हटले आहे. गेल्या 21 जानेवारीला केजरीवाल यांच्या घरात घुसून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावा खुद्द ओम स्वामी यांनी केला आहे.
'यू ट्यूब'वर अपलोड झाला व्हिडिओ
ओम स्वामींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ 'यूट्यूब'वर अपलोड झाला आहे. अरविंद केजरीवाल यांची हत्या करेल, अशी धमकी ओम स्वामींनी त्यात दिली आहे.

'मी परशुरामाचा वंशज असून घंटा वाजवणारा साधू नाही. देशद्रोहींना गोळ्या घालतो. महात्मा गांधींवरही आम्ही गोळ्या झाडल्या होत्या. हिंदू महासभा हा आमचा पक्ष आहे. नथुराम गोडसे आमच्याच पक्षाचा कार्यकर्ता होता. महात्मा गांधी यांनी देशाचे तुकडे केले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली', असे वादग्रस्त वक्तव्य देखील ओम स्वामी यांनी केले आहे.
जो कोणी देशाच्या विरोधात काम करेल, त्याला आधी प्रेमाने समजवले जाते. जसे की केजरीवाल यांना समजवले जात आहे. तरी देखील त्या व्यक्तीने ऐकले नाही तर त्याची हत्या केली जाते, असे ओम स्वामींनी म्हटले आहे.
ओम स्वामी यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवकटवर्तीय असल्याचे म्हटले आहे. गोव्यात भाजपचे महाधिवेशन सुरु होते, तेव्हा मोदींनी आपल्याला फोन केल्याचा दावा स्वामींनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यास अडवाणी यांनी आडकाठी घातली होती. त्यामुळे मोदींना आपल्याला फोन करून 'आप कुछ कीजिए' असे म्हटले होते.
नूपुर शर्मा यांना निवडून आणण्यासाठी रिंगणात...
नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून भाजपने नुपुर शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. नुपूर शर्मा यांना निवडून आणण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे ओम स्वामी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस आणि केजरीवाल यांचे मते फोडून भाजपच्या उमेदवार नूपुर शर्मा यांना समर्थन दिल्याचे देखील स्वामी यांनी म्हटले आहे.