आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election Bjp Mp Veerendra Singh Abuse Aap Leader Arvind Kejriwal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या खासदाराकडून केजरीवालांना शिविगाळ; \'आप\'विरुद्ध भाजप-कॉंग्रेसचे \'पोस्टर वॉर\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भाजपद्वारा केजरीवाल यांच्या विरोधात रविवारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली जाहिरात)
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा ‍निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या एका नेत्याने नवा वाद निर्माण केला आहे. भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना शिविगाळ केली. वीरेंद्र सिंह दिल्लीत एका प्रचारसभेत संबोधित करत होते. यात त्यांनी केजरीवाल यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. दुसरीकडे, भाजपपाठोपाठ आता कॉंग्रेसने 'आप'च्या विरोधात पोस्टर वॉर सुरु केले आहे.

दिल्लीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपने आपल्या खासदार आणि मंत्र्याची फौज उतरवली आहे. दुसरीकडे, पहिल्यांदा कॉंग्रेसने सोशल साइट्‍सवर 'पोस्टर' पोस्ट करून केजरीवाल यांना टार्गेट केले आहे.

केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. केजरीवाल यांनी दोन लाख 16 हजार लोकांची फसवणूक केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळो अथवा न‌ मिळो काशीतील लोकांची सेवा करणार असल्याचे केजरीवाल यांनी वचन दिले होते. मात्र, 'मतलबी' राजकारण करणारे केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीतून विधासभा निवडणूक लढत असल्याचे वीरेंद्र सिंह यांनी म्हटले.

भाजप नेते गोंधळले- केजरीवाल
भाजप नेते गोंधळले आहे. त्यामुळे अर्वाच्च भाषेचा वापर करत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील जनतेला सगळं काही माहीत आहे.

भाजपच्या पाठोपाठ कॉंग्रेसने देखील केजरीवालविरुद्ध पोस्टर वॉर सुरु केले आहे.
भाजपने रविवारी केजरीवाल यांच्या विरोधात वृत्तपत्रातून टीका करणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमध्ये केजरीवाल यांच्या प्रतिकात्मक छायाचित्र वापरण्यात आले आहे.

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी एक ट्‍विट करून जाहिरातीसाठी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे आभार मानले आहे. दरम्यान, कॉंग्रेसने सोशल मीडियावर पोस्टरद्वारा केजरीवाल यांच्यावर हल्ला बोल केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कॉंग्रेसने पोस्ट केलेले पोस्टर...