आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election: Imam Bukhari Appealed To Vote For Aap Issue News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AAP नेच मागितला होता पाठिंबा; जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आज (शनिवारी) सुरुवात झाली असताना 'राजकीय ड्रामा' पाहायला मिळत आहे. जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सैयद अहमद बुखारी यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा दिला होता. मात्र, 'आप'ने तो धुडकावला. त्यानंतर इमाम बुखारी यांनी धक्कादायक दावा केला आहे. तो म्हणजे, 'आप'नेच आपल्याकडे पाठिंबा मागितला होता, असे बुखारी यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना बुखारी म्हणाले की, 'आप'च्या नेत्या अलका लांबा यांनी आपले भाऊ तारिक बुखारी यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला होता. 'आप' पाठिंबा देण्यास आमचा विरोध होता. मात्र, दिल्लीत भाजपची सत्ता येऊ नये, म्हणून 'आप'ला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तसेच दिल्लीतील जनतेला 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर 'आप'ने आपल्या अधिकृत 'टि्वटर' अकाउंटवरून बुखारी यांचा पाठिंबा धुडकावला होता.
मुलाच्या ताजपोशीच्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न बोलवता पाकिस्तानाचे नवाज शरीफ यांना आमंत्रित करत असेल, अशा व्यक्तीचा पा‍ठिंबा 'आप' घेणार नसल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
'आप'ने पाठिंबा न स्विकारल्याचे इमाम बुखारी राजकारण करत असल्याची टीका 'आप' नेता आशीष खेतान यांनी म्हटले आहे.