आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election: Kiran Bedi Send Legal Notice To Arvind Kejriwal

\'आप\'ने संधीसाधू अशी पोस्टर लावल्याने किरण बेदी भडकल्या, केजरीवालांना नोटिस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटिस बजावली आहे. नोटिसीत बेदींनी केजरीवाल यांना त्यांनी नकारात्मक प्रतिमा बनविण्यावरून उत्तर मागितले आहे.
बेदींनी केजरीवालांना पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, आपने जे पोस्टर दिल्लीतील ऑटो रिक्षांच्या मागे लावले त्यात बेदींचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोचा वापर न विचारता केल्यामुळे बेदींनी कायदेशीर नोटिस बजावली आहे. यात म्हटले आहे की, ‘आप’ने लावलेले पोस्टर्स तत्काळ हटवावे अन्यथा त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
आम आदमी पक्षाकडून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. त्यात केजरीवाल यांना ईमानदार (प्रामाणिक) तर किरण बेदी यांना अवसरवादी (संधीसाधू) असे ठरविण्यात आले आहे. हे पोस्टर दिल्लीत चालत असलेल्या ऑटो रिक्षात लावण्यात आली आहेत. किरण बेदींनी या पोस्टरवरूनच केजरीवाल यांना नोटिस पाठवून उत्तर मागितले आहे. आपच्या या निवडणुकीतील स्टंटवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील जनतेला सर्व काही माहित आहे की संधीसाधू कोण आहे प्रामाणिक कोण आहे.