आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election Prime Minister Narendra Modi Ambedkar Nagar Rally

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदींनी AAPला संबोधले \'बाजारू\', पाच वर्षांत बुजावे लागतील 16 वर्षांचे खड्डे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आंबेडकर नगरात जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी) आंबेडकर नगरात चौथी आणि शेवटच्या जाहीर सभेत संबोधित केले. डीडीए ग्राउंडवर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षावर (आप) निशाणा साधला. मोदींनी 'आप'ला 'बाजारु' म्हणून संबोधले.
' पाच वर्षांत आता थोडीही विश्रांती घ्यावी लागणार नाही. कारण 16 वर्षांत कॉंग्रेस आणि 'आप'ने करून ठेवलेले खड्‍डे आधी बुजण्याचे काम करावे लागणार असल्याचा टोला मोदींनी यावेळी लगावला. गेल्या निवडणुकीत काही 'बाजारुंनी' दिल्लीकरांची दिशाभूल करून सरकार स्थापन केले होते. जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केली होती. आता जनताच अशा लोकांना त्यांची जागा दाखवणार आहे. जे लोक प्रामाणिकपणाचा आव आणत आहे, त्यांचा जनतेसमोर भांडाफोड झाला आहे. दरम्यान, 'आप'ने गेल्या निवडणुकीत इंटरनल सर्व्हेमध्ये स्वत:ला पन्नास पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या.'
अनेक अपक्षांच्या नेत्यांवर टीका...
मोदींनी आपल्या भाषणात अनेक अपक्षांच्या नेत्यांवर टीका केली. भाजपच्या प्रत्येक निर्णयाची विरोधकांना अडचण होत आहे. एका गरीब आईचा मुलगा देशाचा पंतप्रधान बनला आहे, हे अजूनही त्यांच्या पचनी पडले नसल्याचे, मोदींनी म्हटले आहे. यावेळी ममता बनर्जी, मुलायम, मायावती, चंद्रबाबू, नीतीश कुमार यांचा नामोल्लेख करून मोदींनी टीका केली.

'व्हिजन डॉक्युमेंट'मधील चूक केली कबूल
भाजपने जाहीर केलेले 'व्हिजन डॉक्युमेंट'मधील चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कबूल केली आहे. 'नॉर्थईस्ट'लोकांसंदर्भात 'immigrants' (दुसर्‍या देशातून आलेले) हा शब्द छापला गेला आहे. भाजपने आपली चूक कबूल केल्याचे मान्य केले आहे. नॉर्थईस्टमध्ये 60 वर्षात विकास झाल असेल त्यापेक्षा जास्त विकास करण्‍याचे मोदींनी आश्वासन दिले. दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास मोदींनी यावेळ‍ी व्यक्त केला.

किरण बेदी म्हणाल्या की, काम कसे करायचे हे चांगल्याप्रकारे येते. आपल्या 40 वर्षांचा सरकारी कामाचा अनुभव आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याच्याबाबत चांगले ज्ञान आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त होत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा सभेची छायाचित्रे...