आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Result 2015: Ego Should Never Comes: Arvind Kejriwal

\'ही आहे माझी पत्नी... कधीच समोर येत नाही\', ऐतिहासिक विजयानंतर केजरींचे पहिले भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीतील विक्रमी यशानंतर केजरीवाल सकाळी 11.45 वाजता पक्ष कार्यकर्त्यांसमोर आले. त्यानंतर कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी 1.10 मिनीटांनी माध्यमांसमोर आल्या. केजरीवालांनी विजयाचे श्रेय पक्ष कार्यकर्ते, नेते आणि कुटुंबीयांना दिले. तर, किरण बेदींनी, माझा पराभव झाला नाही. पराभवाचे चिंतन भाजपने करायचे असल्याचे म्हटले.
विजयानंतरच्या पहिल्या भाषणात केजरीवाल म्हणाले,
आमच्यासाठी अनेकांनी नोकरी सोडली. दुकाने बंद केली. त्यांनी 24-24 तास पक्षाचे काम केले. या विजयाने मी फार आनंदी आहे. पण त्यासोबत थोडी भीती देखील वाटत आहे. जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले आहे. बुहमतापेक्षाही अधिक यश आम्हाला दिले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना माझे सांगणे आहे, की तुमच्या अहंकार कधीही येऊ देऊ नका. कारण तुमच्यात अहंकार आला तर, आज जी भाजपची अवस्था झाली आहे, तीच अवस्था पाच वर्षांनंतर आपली होईल. जनता आपल्यालाही हाच धडा देईल. आपल्याला दिल्लीच्या जनतेची सेवा करायची आहे. मी फार लहान माणूस आहे. पण माझा जनतेवर विश्वास आहे. आम्ही दिल्लीच्या दोन कोटी लोकांनासोबत घेऊन एक असे शहर निर्माण करु ज्यामुळे जगाला आमचा अभिमान वाटला पाहिजे.'

पुढील स्लाइडमध्ये, पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या किरण बेदी