आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Result 2015: Modi Wave Stopped In Delhi, Opposition Happy

मोदी लाटेला दिल्लीत बांध, नितीश-ममतांचे चेहरे उजळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे विरोधकांचे चेहरे खुलले आहेत. याचे कारणही तसेच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जी निवडणूक लढवली, ती जिंकलीच. मग महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड असो वा जम्मू काश्मीर. अरविंद केजरीवाल नावाच्या वादळाने मात्र मोदींची लाट थोपवली. साहजिकच नितीश व ममता बॅनर्जी जाम खुश आहेत.

आप’च्या एकतर्फी विजयाचा सर्वात पहिला परिणाम बिहारमध्ये दिसू लागला आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत जितनराम मांझी यांच्या खांद्यावर हात ठेवून जदमध्ये (संयुक्त) फूट पाडण्यासाठी सरसावलेला भाजप आता मांझींपासून चार हात लांब आहे. जे भाजप नेते मांझींना पाठिंबा दर्शवून सरकार स्थापनेचा दावा करत होते तेच मांझींची बंडखोरी जदयूचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत आहेत. एका भाजप नेत्याने सांगितले, ‘बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे. तोपर्यंत जदयूमधील बंडाळीचा लाभ भाजपला मिळेल.’

या निवडणुकीत सपा, राजद, जदयू, तृणमूल, माकपसारख्या भाजप व काँग्रेसविरोधी पक्षांनी ‘आप’ला पाठिंबा दिला आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप अपराजित नाही, याची खात्री विरोधकांना पटली आहे. मात्र, आपशी आघाडी करण्याची त्यांची इच्छा असेल तर विरोधकांच्या पदरी निराशाच पडेल. ‘कुणाचाही प्रचार करायचा नाही, ना कुणाशी आघाडी’ असे आपचे धोरण आहे. एवढे निश्चित की, दिल्ली निवडणुकीमुळे पुढील वर्षी प. बंगाल, केरळ, आसाम व तामिळनाडूमध्ये होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपेतर पक्षांचा उत्साह वाढला आहे.
वाचा, कोणत्या वर्गाची कुणाला मत...