आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: AAP Candidate Alka Lamba Political Career

AAP चा तरुण चेहरा बनल्या अलका लांबा, काँग्रेसचा \'हात\' सोडून पकडला होता \'झाडू\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूकीत अनेक धक्कादायक निकाल आले आहेत. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आणि अरविंद केजरीवाल यांच्या एकेकाळच्या सहकारी किरण बेदी यांचा कृष्णनगर मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसमधून 'आप'चा झाडू हातात घेतलेल्या अलका लांबा या चांदनी चौक मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. 39 वर्षीय अलका लांबा यांचा एकेकाळी काँग्रेसमध्ये बोलबाला होता. त्यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी नेत्यापासून झाली, आता त्या आपच्या आमदार झाल्या आहेत.
आपच्या नेत्या अलका लांबा यांची एकेकाळी काँग्रेसमध्ये एवढी चलती होती, की मोठे मोठे नेते त्यांच्या कार्यालयात हजेरी लावत होते. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या गुड बुकमध्ये अलका लांबा यांचे नाव सर्वात आधी येत होते. केसरी यांनीच त्यांनी NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले होते.
दिल्लीचे राजकारण बर्‍याच अंशी दिल्ली विद्यापीठाच्या आसपास फिरते. यावेळी निवडणुकीत असे अनेक उमेदवार होते जे पूर्वी दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. चांदनी चौक मतदारसंघातून आपच्या तिकीटावर विजयी झालेल्या अलका लांबा या देखील दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्ष होत्या. त्या दिल्ली निवडणुकांतील 'आप'चा तरुण चेहरा म्हणून समोर आल्या होत्या. उत्कृष्ट भाषणशैली आणि विविध माध्यमांमध्ये पक्षाची बाजू मांडतांना त्या वेळोवेळी दिसल्या आहेत.
अलका लांबा यांनी 1994 मध्ये विद्यार्थी नेत्याच्या रुपात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. काँग्रेस प्रणित नॅशनल स्टूडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) मधून त्या पुढे आल्या.
एका वर्षानंतर त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात मोठा विजयही मिळवला. 1997 मध्ये त्यांना ऑल इंडिया NSUI चे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. काँग्रेसकडून त्यांनी निवडणुकही लढवली. पण भाजपच्या मदन लाल खुरानांकडून त्यांचा पराभव झाला. 2013 मध्ये अलका लांबा यांनी काँग्रेस सोडून "आप' (आम आदमी पार्टी) मध्ये प्रवेश केला होता.
वादांशी नाते
अलका खासगी आयुष्यात अत्यंत स्टायलीश आहेत. त्यांना स्टाइलीश नेत्या म्हणून ओळखले जाते. एकीकडे चांगल्या वक्त्या म्हणून त्यांची ओळख असताना अनेक वादातही त्यांची नाव आलेले आहे. महिला आयोगाच्या सदस्य असताना गुवाहाटी येथील बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करणे, पतीपासून विभक्त होणे हे त्यापैकी काही वाद आहेत. विद्यार्थीदशेपासून अलका यांना लाईम लाइटमध्ये राहणे पसंत होते. 20 वर्षे काँग्रेसमध्ये राहून तिकिट मिळाले नाही, त्यामुळे अलका यांनी पक्ष सोडला होता.

अलका लांबा यांचे राजकीय जीवन
>2002 मध्ये मुख्य राजकारणात प्रवेश केला आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव झाल्या.
>2003 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या मदनलाल खुराना यांच्या विरोधात पराभव झाला.
>2006 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमेटीचे सदस्य बनवण्यात आले.
>2013 मध्ये अलका लांबा यांनी काँग्रेस सोडत "आप' मध्ये प्रवेश केला.

फोटो - अलका लांबा

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अलका लांबा यांची खास छायाचित्रे