आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांनी घेतली राजनाथसिंहाची भेट, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवणार्‍या आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांनी आज (बुधवार) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. यावेळी आप नेत्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या भेटीनंतर मनीष सिसोदियांनी सांगितले, की दिल्ली सरकारची अनेक कामे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे राजनाथसिंह यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध सुधारण्याच्या तयारीत लागले आहे. केजरीवाल गुरुवारी पंतप्रधानांना भेटून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार आहेत. पंतप्रधानांनी मंगळवारी आपला विक्रमी विजयासाठी केजरीवालांना शुभेच्छा दिल्या आणि चहाचे आमंत्रण दिले. गुरुवारी सकाळी दोघांची भेट होणार आहे. या भेटीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
दिल्ली पूर्ण राज्य नाही. यामुळे केजरीवाल यांना पावलो-पावली केंद्र सरकारच्या सहकार्‍याची गरज भासणार आहे. एक राज्य असतानाही दिल्लीकडे राज्यांचे पूर्ण अधिकार नाहीत. जमीन, पोलिस यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. एवढेच नाही, तर दिल्ली महानगर पालिकेवरही केंद्राचेच नियंत्रण आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, केजरीवालांनी कोणाकोणाची घेतली भेट