आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Kejriwal Before Victory Celebration At The Village

अरविंद केजरीवालांच्या खेडा आणि सिवानी मंडीत विजयोत्सव, काकांनी वाजवले फटाके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ढोल ताशाच्या तालावर ठेका धरताना केजरीवालांचे नातेवाईक)

पानीपत- दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेससह भाजपचा सुपडा साफ केला आहे. दिल्लीत 'आप'चा विजयोत्सव सुरु झाला आहे. तसेच केजरीवालांचे मूळ गाव खेडा आणि सिवानी मंडीत (हरियाणा) देखील जल्लोष सुरु झाला आहे.

खेडा आणि सिवानी मंडीत सकाळपासून लोक ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत आहे. जनतेला लाडू वाटले जात आहे. केजरीवाल यांचे काका गिरधारीलाल तर फटाके वाजवून आनंद साजरा करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर संपूर्ण शहरवासियांना अभिमान असल्याचे गिरधारीलाल यांनी सांगितले. केजरीवाल यांचा जन्म जन्माष्ठमीला झाला होता.
तसेच हरियाणातील 'आप' समर्थक केजरीवाल यांच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर केजरीवाल आपल्या मूळगावी नक्की येतील असा विश्वास शिवानी मंडीतील लोकांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीत 'आप'ची सत्ता यावी अशी खेडा गावातील जनतेची इच्छा होती. ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केल्याचे त्यांची काकू रामदुलारी यांनी सांगितले. केजरीवाल यांचे कुळदैवत खेडा येथे असून रामदुलारी आज मंदिरात जाऊन देवीची ओटी भरणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, अन्य फोटो....