आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Satta Bazar Prediction Bjp Got Majority 45 Seat News In Marathi

EXCLUSIVE: सट्टा बाजार आणि EXPERT च्या नजरेतून दिल्लीतील स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- एक्झिट पोलचे अंदाज)
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 फेब्रुवारीला समोर येणार आहे. मात्र, न‍िकालपूर्व जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलने आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सट्टा बाजारात तेजी आहे.
'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत सरकार स्थापन होण्याचा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे.

सट्टा बाजारानुसार 'आप'ला 39, भाजपला 26 आणि कॉंग्रेस 5 जागा मिळतील. सट्टा बाजार आणि बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज मिळतेजुळते आहेत.

सहा वृत्त वाहिन्या तसेच सर्व्हे एजन्सीने 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे म्हटले आहे. सहा एक्झिट पोलमध्ये 'आप'ला 44, भाजपला 26 आणि कॉंग्रेसला फक्त तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

दुसरीकडे, 'पर्सेप्शनल पोल'ने दिल्लीतील सर्व 70 मतदार संघातील जनतेचे मत जाणून घेतले आहे. पर्सेप्शनल पोल ने मतदानाच्या 48 तासांपूर्वी जनमत जाणून घेतले होते. त्यानुसार, दिल्लीतील 70 पैकी 36 जागांमधून 'आप'ला 16, भाजपला 14 आणि कॉंग्रेसला 6 जागा मिळू शकतात. मात्र, 34 जागांवरून 'आप' विरुद्ध भाजप अशी काट्याची लढत पाहायला मिळेल.

‍दिल्लीत मतदान होण्यापूर्वी आमची सहकारी वेबसाइट 'dainikbhaksar.com'च्या एक्सपर्ट्सने देखील ‍70 जागांविषयी अंदाज वर्तवले आहेत. दिल्लीत भाजपला 41, 'आप'ला 22 तर कॉंग्रेसला 8 जागा मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक डॉ. विनय प्रकाश आणि अजीत सिंह यांनी वर्तवली होती. मात्र, मतदानाच्या दिवशी परिस्थिती अचानक बदलली. मतदारांनी 'आप'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे.

एक्सपर्ट, सट्टा बजार, आणि पर्सेप्शनल पोलचे अंदाज...

अंदाज आप भागप कॉंग्रेस एकूण जागा
सट्टा बाजार
- 39 26 05 70
एक्सपर्ट - 22 41 07 70
पर्सेप्शनल पोल- 16 14 06 36/70 (उर्वरित 34 जागांसाठी काट्याची लढत)
एक्झिट पोल - 35-43 25-33 0-02 70